सातारा शहर जिल्हा मुख्यालय तसेच सातारा उपविभागाचे आणि तालुक्याचे मुख्यालय आहे.तालुकाआणिउपविभागामध्येच नागरीकांचा मुख्यत्वे करुन, महसूली सेवा दिली जात असते. त्यामुळे सातारच्या ब्रिटीशकालीन तहसिल आणि प्रांतकार्यालयाचे इमारतीचे ठिकाणी नवीन सुसज्य इमारत महसुल विभागाने उभारणे गरजेचे आहे हे लक्षात घेवून आम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून प्रांत आणि तहसिलकार्यालयाच्या नवीन इमारतींचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यास मंजूरी देवून, निधी उपलब्ध करुन देण्यात यावा जेणेकरुन नजीकच्या काळात याठिकाणी सुसज्य प्रांत आणि तहसिलकार्यालय नागरीकांच्या
आणि कर्मचारी अधिकारी यांच्या सुविधेसाठी साकारले जाईल अशी मागणी खासदार श्री छ उदयनराजे यांनी राज्याचे महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचेकडे केली.
आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्याचे महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने सातारच्या तहसिल आणि प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी नवीन सुसज्य इमारत उभारणेबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे
भोसले यांनी ना.बाळासाहेब थोरात यांचेकडे प्रस्तावित केले.
यावेळी बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आग्रही मागणी करताना प्रस्तावित केले की, सातारचे प्रांत कार्यालय आणि तहसिल कार्यालय, पोवई नाका ते स्टॅन्ड या रस्त्यावर आहे. याठिकाणी मोठी जागा आहे. तथापि आत्ताची इमारत ब्रिटीश कालीन असून, त्या जागेवर पुर्वी ब्रिटीश सैनिकांची हजेरी आणि कायदा व सुव्यवस्थतेचे काम केले जात होते. त्याच ठिकाणी तहसिलदार कार्यालय
आणि प्रांतकार्यालय अशी दोन स्वतंत्र आणि महत्वाची कार्यालये सुरु झाली. पूर्वी त्याठिकाणीउपवनसंरक्षक यांचे देखिल कार्यालय होते. ते आता कराड रोडवरील स्वतःच्या जागेत स्थलांतरीत झाले आहे. ब्रिटीशकाळात पोलिस स्टेट म्हणून कामकाजावर भर होता. आता दिवसेंदिवस वेलफेअर स्टेटच्या
धारणेतुन महसुल यंत्रणेवर कामाचा ताण वाढत आहे. अनेक प्रकारचे दाखले, दावे,नोदणी, नकाशे,उतारे,सुनावण्या, निवडणुकीचे कामकाज, सेतु उपक्रम, इ.कामकाज येथुन होत आहे. याच परिसरात दुययम निबंधक तालुका भुमी अभिलेख, जिल्हा भुमि अभिलेख, नगरभुमापन अधिकारी यांची देखिल कार्यालये आहेत. तहसिल व भुमी अभिलेख ची कार्यालये अक्षरशः कोडवाडयात रुपांतरीत झालेली आहेत.प्रात
कार्यालयातील रेकॉर्डविभाग, कधीही मोडकळेल अश्या अवस्थेत खुराडयात रुपांतरीत झाले आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची कार्यक्षमता देखिल कमी होत असते आणि नागरीकांची देखिल प्रचंड गैरसोय होत असते. त्यामुळे याठिकाणी नवीन प्रशस्त अशी दुमजली किंवा बहुमजली इमारत उभारणे गरजेचे
आहे.याबाबत शासनाने तातडीने विचार करुन या कामासाठी निधीची तरतुद करावी अशी मागणी केली. ना.बाळासाहेब थोरात यांनी, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी केलेली मागणी रास्त आहेच तथापि अद्यापपर्यंत कोणीच काही कशी मागणी केली नाही असे आश्चर्य व्यक्त करुन खासदारांनी केलेली
सूचना आणि दिलेला प्रस्ताव जातीने लक्ष घालून मार्गी लावू. निधीची देखिल भरीव तरतूद करुन, प्रांत आणि तहसिल व इतर कार्यालयासाठी नवीन इमारतीचे कामास मंजूरी देण्याची कार्यवाही केली जाईल असे वचन यावेळी दिले.
या चर्चेच्या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या भुयारी गटर योजनेचे काम प्रगतीपथावर आहेया योजनेच्या एस.टी.पी.प्लॅटचे कामासाठी जरंडेश्वरनाका, सदरबझार येथील शासकीय जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करणेविषयी विनंती केली असता,त्यास ना थोरात यांनी मान्यता दिली, तसेच त्यांनी जिल्हाधिकारी यांनाही कळविले आहे. त्यामुळे भुयारी गटर योजनेसाठी मलनिस्सारणासाठी आवश्यक एस.टी.पी.प्लॅन्टसाठी जागा उपलब्ध झाल्याने,त्याठिकाणी सदरचा प्लॅट उभारुन गटर्समधुन आलेले अस्वच्छ पाणी स्वच्छ करुन बागा/शेती साठी पुरविले जाणार आहे. दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नागरीकांच्या हिताकरीता, महत्वाच्या विषयाला हात घातल्याने, नागरीकांमधुन आणि संबंधीतांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.