प्रभाग रचनेवरील हरकतींच्या सुनावणीला 23 मे पर्यंत मुदत

237
Adv

सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व एका नगरपंचायती साठी सुधारित प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाचा पहिला अंक सुरू झाला आहे जिल्हा प्रशासनाने सोमवारी प्रभागांचे नकाशे दर्शनी भागात जाहीर करून त्याच्यावर हरकती नोंदवण्यासाठी मुभा दिली आहे या हरकतींवर 23 मे रोजी सुनावणी होणार असून दिनांक 10 ते 14 एप्रिल या दरम्यान या हरकती नोंदवल्या जाणार आहेत ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून प्राप्त होताच राज्य निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आला आहे 27 नोव्हेंबर 2019 च्या निर्देशानुसार जुन्या प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोग गांभीर्याने विचार करत आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून सातारा शहरातील 25 प्रभाग रचना आणि उत्तर पूर्व आरक्षण निहाय क्षेत्र याची चाचपणी मात्र काळजीपूर्वक केली जाणार आहे प्रभाग रचना ज्या पद्धतीने की वर्तुळाकार यावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही

सातारा फलटण कराड वाई रहिमतपूर म्हसवड महाबळेश्वर पाचगणी व मेढा नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रभाग रचनेवर हरकती नोंदणीसाठी 14 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे या मुदत तीन चा कालावधी 10 मे सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झाला आहे या हरकती विहित नमुन्यात आणि सविस्तर पद्धतीने नगरपरिषद संचालन विभागांमध्ये नोंदवायचा आहेत याचे संकलन करून हा अहवाल हाय्यक आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना अवगत करावयाचा आहे िल्हाधिकार्‍यांनी 23 मे पर्यंत या सुनावणी घेऊन 30 मे पर्यंत त्या सुनावणी संदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करावयाचा आहे अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना त्यानंतर जाहीर केली जाणार आहे तसेच अंतिम मतदार यादी हरकती सूचना व व आरक्षण या ही कार्यक्रमांना लवकरच सुरुवात केली जाणार आहे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाने आता वेग पकडला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सातारा जिल्हा दौरा प्रस्तावित असून जिल्ह्यातील नगरपालिकेत किती जागा प्रस्तावित केल्या जाऊ शकतात याची चाचपणी केली जाणार आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनीही या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू झाली आहे सातारा जिल्ह्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे समन्वय आणि संघटन अशी जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे

राष्ट्रवादीच्या गोटातही सावधपणे चाचपणी सुरू असून पवारांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना संघटन बांधणी साठी गोपनीय सूचना मिळाल्याचे वृत्त आहे आम आदमी पक्षाचा संवाद सोहळा कार्यक्रम साताऱ्यात लवकरच घेतला जाणार आहे त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला पक्षीय मिळावी आणि दौऱ्याची फोडणी मिळायला सुरुवात झाली असून लवकरच राजकीय हालचालींना आणखी गती मिळणार आहे

Adv