सुशांत मोरे यांच्या दणक्याने पालिकेसमोरील रस्त्याचे काम सुरू

225
Adv

सातारा पालिकेच्या समोरच नूतन रस्ता पावसाळ्यात खराब झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी या रस्त्याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र दिवाळीनंतर काम करतो असे संबंधित ठेकेदाराने सांगितल्याने सदर काम आज सुरू झाले आहे

काही महिन्यांपूर्वी सातारा पालिकेच्या समोर डांबरीकरण करून रस्त्याचे काम करण्यात आले होते मात्र पावसाळ्यात हा रस्ता खराब झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी या रस्त्याप्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता इशारा दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराला जाग आल्याने दिवाळीनंतर रस्ता करतो असे केसरकर पेठ येथील सातारा पालिकेच्या इमारतीसमोर ते वाहतूक विभाग सातारा पुन्हा सुस्थितीत झाला आहे

अनेक सातारकरांचे कंबरटे मोडण्यापासून वाचले.. सुशांत मोरेचे नागरिकांनी मानले धन्यवाद

सातारा पालिकेच्या समोरीलच रस्ता खराब झाल्याने संबंधित नामक ठेकेदार काय क्वालिटीची काम करतो हे जगाला समजले गेले तीन महिने सातारकर नागरिक शाहू चौकातील स्पीड ब्रेकर वरून आपले कंबरटे धरूनच गाडी चालवताना आपल्याला दिसले सातारकरांचे कंबरटे सुशांत मोरे यांनी वाचले असल्याने नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले

पालिकेसमोर झाले होते निकृष्ट दर्जाचे काम?

सातारा पालिकेच्या समोरच नूतन रस्ता होऊन एका पावसाळ्यातच तो खराब झाला त्यामुळे सातारा पालिकेच्या समोरच जर निकृष्ट कामे होत असतील तर अशा ठेकेदारांना काळा यादीत टाकण्याचे धाडस बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिलीप छिद्रे हा सवाल उपस्थित होत आहे

आज दुरुस्त केलेला रस्ता टिकणार तरी किती दिवस

पावसाळ्यापूर्वी केलेला रस्ता एका पावसाळ्यातच खराब झाल्याने पालिकेसमोर ठेकेदाराची नाचक्की झाली हे नक्की आज दुरुस्त केलेल्या रस्ता पुन्हा किती दिवस टिकणार हा प्रश्न आता सातारकर नागरिक यांना पडलेला असून या रस्त्याला तीन वर्षात काही झाले तर त्याला संबंधित ठेकेदार जबाबदार असतो मात्र ठेकेदाराच्या मटरेल मध्येच जान नसेल तर हा रस्ता टिकेल कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे

Adv