Monday, May 18, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City मंत्रिमहोदयांच्या बैठकीत नगराध्यक्ष व नगरसेवकांना सुनावले खडे बोल

मंत्रिमहोदयांच्या बैठकीत नगराध्यक्ष व नगरसेवकांना सुनावले खडे बोल

517
Adv

उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर व बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्या वादावादी नंतर खासदार व आमदार ॲक्शन मोडमध्ये आले असून आज झालेल्या सुरुची येथील बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगराध्यक्षसहित सर्वच नगरसेवकांना खडे बोल सुनावले

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज नगराध्यक्षांच्या सहित नगरसेवकांची एक बैठक घेतली या बैठकीत त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले सातारा पालिकेची निवडणूक झाली म्हणजे सर्व काही होत नाही खासदार व मंत्री म्हणून आम्ही जिल्ह्यासह राज्यात फिरतो तिथे काय आम्ही सांगायचे पालिकेत झालेला प्रकार चुकीचा असून तिथून पुढे कोणीही असले गैरवर्तन केल्यास मी खपवून घेणार नाही पालिकेत रील काढण्यापेक्षा कामावर जोर देऊन लोकांच्यात मिसळा खासदार आमदार गट न करता एकोप्याने राहून कारभार चालवा अशा स्पष्ट शब्दात सूचना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या

नूतन नगरसेवकांची अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घ्या असा सल्लाही मंत्री महोदय यांनी दिला असून पालिकेत गैर कारभार व गैर कृत्य खपवून घेणार नाही तब्बल एक तास मंत्री महोदय व नगरसेवकांची बैठक सुरू होती या बैठकीच्या कान पिचक्यांनी अनेकांचे कान व डोळे उघडले असतील हे मात्र नक्की

Adv