पालकमंत्री महोदय साताऱ्यात फेरफटका मारा आणि कडक लाँकडाऊनचा अर्थ सांगा असे म्हणण्याची वेळ आता आली आहे केंद्राने केलेला लाँकडाऊन आणि राज्याचा लाँकडाऊन यात जमीन-अस्मानचा फरक असल्याचे दिसून येते त्यामुळे साताऱ्यात कडक लाँकडाऊन कसा म्हणायचा हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यात फेरफटका मारून सातारा शहराचा आढावा घेतला होता आता शहरात मात्र विनाकारण फिरणारे सकाळी व संध्याकाळी स्वतःच्या शरीरासाठी फिरणारे यांची संख्या जास्त असून याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे दिसून येते जिल्ह्याची कोरोनाची आकडेवारी कमी व्हायचे नाव काही घेत नाही शहरात विनाकारण पेट्रोल भरून फेरफटका मारणारे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यामुळे कडक लाँकडाऊनचा अर्थ आता मऊ पडल्याचे दिसून येते
प्रशासनाने जरी पंधरा दिवस लॉकडाउन वाढवला असला तरी आकडेवारी कमी होताना दिसत नाही पुणे, मुंबई सारखी शहरे यांची संख्या आता कमी होऊ लागली आहे मात्र सातारा जिल्ह्याची संख्या जैसे थेच परिस्थिती दिसून येते त्यामुळेच पालकमंत्री महोदय साताऱ्यात फिरा आणि कडक लाँकडाऊन चा अर्थ सांगा असे म्हणण्याची वेळ आता आली आहे