कृषी- औद्योगिक- शैक्षणिक क्रांती घडवणारे नेतृत्व म्हणजे आ श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले..ओंकार भंडारी

211
Adv

स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासगंगेचा उगम करुन सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक विकासाला चालना दिली. अजिंक्य उद्योग समुहाच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यातील बेरोजगारीला लगाम घालण्याचे काम केले. त्यांच्या पश्‍चात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उंच शिखरावर नेवून ठेवले आहे. केवळ साखर निर्मीतीवरच अवलंबून न राहता साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प, सहवीज निर्मीती प्रकल्प असे मुल्यावर्धित प्रकल्प सुरु करुन साखर उद्योगाला खर्‍या अर्थाने उर्जीतावस्था प्राप्त करुन दिली. आज शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे वेळेत संपूर्ण बिल अदा करणारा राज्यातील एकमेव कारखाना असा नावलौकिक अजिंक्यतारा कारखान्याचा आहे. अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत प्रत्यक्ष सूत उत्पादास प्रारंभ करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्व. भाऊसाहेब महाराज आणि सातारा तालुक्याचे स्वप्न पुर्णत्वास नेले. सूत गिरणीच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असून प्रत्येक हाताला काम देण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खर्‍या अर्थाने सत्यात उतरले आहे. 

कारखाना कार्यस्थळावर सुरु करण्यात आलेल्या अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रीकी महाविद्यालयामुळे सातारा तालुक्यासह जिल्हाभरातील गोरगरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. मुलींना मोफत शिक्षण देणार्‍या या महाविद्यालयाने असंख्य गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि इंजिनियर्सघडवले आहेत. अजिंक्यतारा सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी- विक्री संस्थेच्या माध्यमातून सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मालाला दर्जा आणि रास्त भाव मिळवून दिला जातो. शेतकर्‍यांचा माल अधिक दर्जेदार असावा, त्याला चांगला भाव मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून संस्थेच्या कोल्ड स्टोरेज युनीटची उभारणी झाली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आधूनिक शेतीची ओळख होण्यासाठी  फळे, फुले संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय ख्यातीप्राप्त निसर्ग कृषी प्रदर्शनात दरवर्षी शेतकर्‍यांची जत्रा भरते आणि या आधुनिक कृषी प्रदर्शनात जिल्हाभरातील शेतकर्‍यांना आपण शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी गहू- ज्वारी, तांदूळ महोत्सव आयोजित केले जात असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती घडली आहे.  

Adv