राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा १७ व १८ एप्रिल रोजी साताऱ्यात

211
Adv


महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा सातारा जिल्हयात येणारमा.ना.जयंतराव पाटीलसाहेब यांच्या नेतृत्वाखाली निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद
यात्रा राज्यातील २५५ विधानसभा मतदार संघ व ३५ जिल्हयामध्ये फिरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटीलसाहेब यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.सातारा जिल्हयात परिवार संवाद यात्रा १७ व १८ एप्रिल रोजी येणार असून त्यामध्ये ४ विधानसभा मतदार संघातील आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. सुरुवातीला रविवार दि.१७ एप्रिल रोजी स.९.३० वा. वाई येथे आगमन होणार असून चित्रा टॉकीज वाई येथे वाई विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. नंतर दु. १२.३० वा.सातारा
विधानसभा मतदार संघातील आढावा बैठक मेढा येथील कलश मंगल कार्यालयात होणार आहे.

दु.३.०० वा.परिवार संवाद यात्रेचे आगमन सातारा शहरात आगमन होणार असून राष्ट्रवादी भवन सातारा येथे जिल्हा कार्यकारणीची आढावा बैठक होणार आहे. नंतर सायं.५.३० वा कोरेगाव विधानसभा मतदार संघातील आढावा बैठक गिताई मंगल कार्यालय मार्केट यार्ड कोरेगाव येथे होणारआहे. नंतर संवाद यात्रेचे मुक्काम पाटण येथे होणार आहे. नंतर सोमवार दि.१८ एप्रिल रोजी स. ९.३० वा पाटण विधानसभा मतदार संघात आढावा बैठक पाटण स्पोर्टस क्लब येथे होणार आहे. तदनंतर संवाद यात्रा सांगली जिल्हयात जाणार आहे. सदर संवाद यात्रेत विधानपरिषदेचे सभापती मा.ना.रामराजे नाईक निंबाळकर,.ना.बाळासाहेब पाटील पालकमंत्री,मा.खा.श्रीनिवास पाटील,.आ.शशिकांत शिंदेआ.मकरंद पाटील,आ.दिपक चव्हाण, मा.विक्रमसिंह पाटणकर सत्यजित पाटणकर दिपक पवार मा.सुनिल माने यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तसेचसर्व फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हयातील सर्व फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थित होणार आहे.

Adv