राष्ट्रवादीचे अखेर ठरले महाविकास आघाडीचे पॅनल सातारा पालिकेत उतरणार

680
Adv

समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन सातारा शहराचा खुंटलेला विकास जर संपवायचा असेल तर दीपक पवार हे एकमेव नेतृत्व आहे की जे या शहरांमध्ये सामान्य जनतेला न्याय देईल आणि शहराचा विकास करतील असा माझा विश्वास आहे . म्हणून दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नगरपालिकेला पॅनल उभे करणार.अजित दादा पवार
आज पुणे येथील बारामती होस्टेल या ठिकाणी दीपक पवार व अजितदादा यांची संयुक्त बैठक होऊन प्रदीर्घ चर्चा झाली . शहराच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या बद्दल देखील चर्चा झाली आणि लवकरच सातारा शहरांमध्ये एकत्रित बैठक घेण्याविषयी देखील वेळ निश्चित केलेली आहे.

आगामी काळामध्ये शहरांमध्ये सामान्य जनतेचे होत असलेली मुस्कटदाबी विकासाच्या फसव्या घोषणा याच्यामुळे जनता त्रस्त आहे.दीपक पवार यांनी सांगितले सातारा शहर नगरपालिकेमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व सामान्य कुटुंबातील जनतेची नाळ असलेले उमेदवार उभे करणार. लवकरच शरद पवार साहेबांच्या बरोबर एक मीटिंग घेऊन सातारा शहरांमध्ये भव्य मेळावा होणार आहे अशी दीपक पवार यांनी माहिती दिली.
सातारा शहरातील अनेक लोक त्याच बरोबर विविध पक्षांचे व संघटनांचे प्रमुख दीपक पवारांना भेटत आहेत . वेगवेगळ्या नगरपालिकेच्या वार्डमधील इच्छुक उमेदवार देखील भेट घेत आहेत परंतु सातारा शहरांमध्ये एक खुला मेळावा घेऊन चित्र स्पष्ट करणार आहे. सध्या देशामध्ये (नफरत तोडो, भारत जोडो) त्याच प्रकारे सातारा शहरांमध्ये आपल्याला पॅनल उभे करावे लागणार आहे

Adv