आ. तांबे यांनी घेतली छ उदयनराजे भोसले यांची भेट

242
Adv

नाशिक पदवीधर विधानसभा मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे व खासदार छ उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट शासकीय विश्रामगृहात झाली तांबे यांनी छ उदयनराजे यांच्याशी हस्तांदोलन केले तर छ उदयनराजे यांनी तांबे यांना गळ्यात शाल घालत सगळ्यांनी असाच फास दिला होता काय ?अशी राजकीय मिश्किली केल्याने एकच हशा उसळला ती मिश्किली पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या संदर्भाने होती या मिश्किलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला .

नाशिक पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद आ सत्यजीत उतांबे हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते कोल्हापूरला जाताना तांबे यांनी विलासपूर येथील उद्योजक व खासदार छ उदयनराजे भोसले यांचे समर्थक संग्राम बर्गे यांची सदिच्छा भेट घेतली त्यानंतर सत्यजित तांबे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर खासदार छ उदयनराजे भोसले यांची भेट घेतली छ उदयनराजे यांचे सर्वपक्षीय संबंध हे सर्वश्रुत आहे नवनिर्वाचित आमदार तांबे यांचा उदयनराजे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .

मात्र शाल घालताना छ उदयनराजे यांनी शालीचा एक कोपरा तांबे यांच्या गळ्याभोवती आवळण्याचा मिश्किल फार्स करत पदवीधरच्या निवडणुकीत असाच सगळ्यांनी त्रास दिला ना अशी टिप्पणी दिली उदयनराजे यांच्या राजकीय टोलेबाजीला सत्यजित तांबे यांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे हस्तांदोलन करत दाद दिली त्यानंतर उदयनराजे यांनी तांबे यांच्याशी विविध विषयावर वीस मिनिटे दिलखुलास चर्चा केली छ उदयनराजे व तांबे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती

यावेळी युवाशकती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे,माजी शिक्षण सभापती सुनील काटकर,पंकज चव्हाण माजी नगराध्यक्ष नासीर शेख इं उपस्थित होते .

Adv