वसुंधरा अभियान स्पर्धेत सातारा पालिकेचा तृतीय क्रमांक

275
Adv

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने सातारा पालिकेने राज्यस्तरावर अमृत गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे या गटामध्ये पुणे महानगरपालिका व सातारा नगरपालिका यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे पालिकेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना बक्षीस प्रमाणपत्र देऊन विशेष अभिनंदन केले आहे

मुंबई नरिमन पॉईंट येथील टाटा थिएटरच्या एनसीपी हॉलमध्ये बक्षीस पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय राहायला हवे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले तर अशा पर्यावरण संवर्धन योजनांसाठी वित्त विभागाच्या वतीने दरवर्षी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली

सातारा जिल्ह्यातील वर्ग असणाऱ्या एकमेव सातारा पालिकेने माजी व सुंदर अभियान स्पर्धेत अमृत योजनेमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला पर्यावरण संवर्धनाच्या निमित्ताने सातारा पालिकेने जे विशेष नियोजन केले विशेषतः घनकचरा प्रकल्प उभारणी करून कचरा निर्मूलन प्रात्यक्षिक आणि त्याचे विलगीकरण हे उपक्रम यशस्वीरीत्या राबवले या वेगळ्या प्रकल्पाची दखल राज्य शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या वतीने घेण्यात आली त्यामुळे सातारा पालिका आणि पुणे महानगरपालिका यांची अमृत गटामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी निवड झाली या योजनेचे बक्षीस लवकरच नगर विकास विभागाच्या वतीने दिले जाणार आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या योजनेचे बक्षीस प्रमाणपत्र स्वीकारले

या कार्यक्रमास व्यासपीठावर उपनगराध्यक्ष म्हणून शेंडे शहर अभियंता दिलीप चित्रे माझी वसुंधरा अभियानाचे समन्वयक विशाल सुर्वे आरोग्य मुकादम जगन्नाथ आरोग्य निरीक्षक सागर बडेकर व प्रशांत गंजीवाले आणि स्वच्छता कर्मचारी अमित चव्हाण उपस्थित होते सातारा पालिकेच्या या विशेष यशाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विशेष अभिनंदन केले असून यापुढेही विकासाची ही प्रक्रिया अशीच असल्याचे एका प्रतिक्रियेत द्वारे सांगितले आहे

Adv