काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या 6 युवकांची जामीनावर मुक्तता

314
Adv

५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले . या संदर्भात साताऱ्यात काही युवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड केली होती . या युवकांची सातारा जिल्हा न्यायालयाने पंधरा हजाराच्या जामीनांवर मुक्तता केली .

निखिल विजय यादव, उदय राज रामचंद्र माने, शुभम शिवाजी मोहिते, यशराज प्रवीण शिंगटे, प्रसाद संजय भोसले, सूरज अशोक येवले यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 416,420 421 प्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते .

पोलिसांनी त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांची पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली . या युवकांच्या वतीने अॅड संग्राम मुंढेकर, अॅड अमर सिंह काटकर, अॅड प्रमोद शिंदे, अॅड संजीव दुदुसकर, श्रीकांत पन्हाळे, शर्मिला शिंगटे, अॅड अनुजा जमदाडे, अॅड योगेश साळुंखे, अॅड अभिजीत बाबर, अॅड भक्ती जोशी, अॅड युवराज देवडे, अॅड संदेश कुंजीर, अॅड मन जीत माने, अॅड मोनिका गायकवाड, यांनी काम पाहिले . अॅड शैलेश चव्हाण ( उच्च न्यायालय ) यांचे विशेष सहकार्य लाभले .

Adv