Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City मंगळाई कॉलनी व सुमित्राराजे हाऊसिंग सोसायटी मध्ये कमी दाबाने पाणी

मंगळाई कॉलनी व सुमित्राराजे हाऊसिंग सोसायटी मध्ये कमी दाबाने पाणी

299
Adv

शाहूनगर परिसरातील चार भिंतीच्या उतारावर वसलेल्या मंगळाई कॉलनी आणि सुमित्राराजे हाऊसिंग सोसायटी येथील पाणी प्रश्न गंभीर झाला आहे कमी दाबाने पाणी येत असल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर जय सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भोसले यांनी पहाटे तीन वाजता स्वतः या कॉल यांचा दौरा करून पाणी प्रश्न आणि परिस्थिती जाणून घेतली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले

सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूनगर ते जगताप वाडी या क्षेत्रातील 47 कॉलनी पायाभूत सुविधांसाठी झगडत आहेत .जय सोशल फाउंडेशन ने नगरपालिकेकडे पाठपुरावा करून येथे घंटागाडीची सोय उपलब्ध करून दिली . मात्र उन्हाळ्याच्या वाढत्या झळा आणि बाष्पीभवनामुळे पाण्याची टंचाई त्यानुसार सुमित्राराजे हौसिंग सोसायटी मंगळाई कॉलनी तसेच लगतच्या परिसरामध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत . महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटलेला नाही मुळातच धोम धरणातून कृष्णा नदीच्या पात्रात पाणी कमी येत आहे . प्राधिकरणाच्या माहुली येथील उपसा केंद्राजवळ त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही . त्याचा फटका शाहूनगर च्या अनेक वसाहतींना बसत आहे

जय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले यांनी हा प्रश्न हाती घेतला असून त्यांनी पहाटे तीन वाजता स्वतः मंगळी कॉलनी आणि सुमित्रा हाऊसिंग सोसायटी या परिसराचा पायी दौरा केला येथे बहुतांश ठिकाणी पाणी येण्याची वेळ पहाटे चार असल्यामुळे सागर भोसले यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधून या समस्या जाणून घेतल्या शाहूनगर परिसर ते जगतापवाडी सध्या येथे एकच पाण्याची टाकी असून आणखी दोन पाण्याच्या टाक्या ची येथे नितांत आवश्यकता आहे या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले मोटे यांच्याशी निश्चितच चर्चा करू असे आश्वासन सागर भोसले यांनी दिले आहे

Adv