विनायक गोसावी मित्र समूहाने केली घर कामगार करणाऱ्या महिलांना किराणा किटचे वाटप

596
Adv

विनायक गोसावी मित्र समूहाने घर कामगार करणाऱ्या महिलांना किराणा किटचे वाटप केले असून या महिला कामगारांनी मित्र समूहाचे आभार मानले असून यापुढेही मित्र समूह गोरगरिबांना विविध स्वरूपाची मदत करणार असल्याचे विनायक गोसावी यांनी यावेळी सांगितले

शहरांमध्ये वाढत्या कोरोनाच्या पादूर्भावामुळे गेले अनेक दिवसांपासून कडक लॉक डाऊन सुरु आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे तसेच छोटे-मोठे व्यवसायिक यांचे धंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत कांही कुटुंबांना जगणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर विनायक गोसावी मित्र समूहाने घर काम करणाऱ्या महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. १० प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू या कीट मध्ये आहेत

जनसेवा ग्रुप तर्फे घरकाम करणाऱ्या महिलांना प्रत्येकी दोन किलो खाद्य तेल ,प्रत्येकी दोन किलो डाळ ,साबण, मास्क या वस्तुंचे वाटप करण्यात आले या गोष्टी रेशनिंग दुकानात किंवा सरकारी यंत्रणा पुरवत नाहीत हे ग्रुप चे सदस्यांच्या निदर्शनास आले आणि तेल डाळ यांचे भाव खूप आहेत हे ओळखून फुल ना फुलाची पाकळी या प्रमाणे आम्ही साताऱ्यातील महिलांना प्रामाणिक हेतूने मदत केली या वेळेस ग्रुप अध्यक्ष विनायक गोसावी,प्रमोद गोसावी,बापू गोसावी,अमोल गोसावी, राजू मोरे, गणेश पवार ,मयुर गोसावी,गणेश पुजारी,सुमित चव्हाण,रजत उपस्थित होते

Adv