विलासपुर मध्ये किरण नलवडेच पालिका निवडणुकीसाठी सक्षम पर्याय …

85
Adv

सातारा पालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक जणांचे प्रभाग आरक्षित झाले त्यामध्ये प्रामुख्याने विलासपूरचा समावेश होतो ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी विलासपूर मतदारसंघ राखीव झाला असला तरी माजी ग्रामपंचायत सदस्य किरण नलावडे यांच्या रूपाने विलासपूर वासियांना नवा चेहरा मिळाला आहे

भाजप युवा नेते संग्राम बर्गे यांनी अनेक वर्षापासून या विलासपूर परिसरात कोट्यावधींची कामे केली त्यामुळे विलासपुर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे विलासपुर शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेले किरण नलवडे यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असून राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्यापासून ते राज घराण्याशी एकनिष्ठ आहेत विलासपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य असा त्यांना राजकीय अनुभव असून याचा उपयोग नक्कीच सातारा पालिकेच्या निवडणुकीत होणार आहे

किरण नलवडे यांच्या रूपाने एक सक्षम पर्याय निर्माण झाल्याने अनेकांच्या बत्त्या गुल झाल्या असल्या तरी विलासपूर परिसरात येणाऱ्या काळात राजकीय धुळवड पाहायला मिळणार हे नक्की

Adv