उद्या प्रतापगडावर छ उदयनराजे यांच्या हस्ते होणार महाभिषेक सोहळा

200
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्तेनवमीच्या निमित्ताने मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता तुळजाभवानीला महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती छ उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने देण्यात आली .

छत्रपती शिवरायांच्या शिवपराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेचे अध्यात्मिक महत्व मोठे आहे . दरवर्षी राजघराण्याच्या वतीने भवानी मातेच्या पूजनाचे कुलाचार प्रथेप्रमाणे पाळले जातात गेले दोन वर्ष करोना संक्रमणामुळे धार्मिक विधींवर निर्बंध आल्याने ही पूजा होऊ शकली नव्हती मात्र यंदाचे नवरात्र पूर्णतः निर्बंध मुक्त आहे

त्यामुळे खासदार श्री छ उदयनराजे भोसले मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता प्रतापगडावर उपस्थित राहून तुळजाभवानी मातेचे दर्शनं घेणार आहेत त्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाअभिषेक आयोजित करण्यात आला आहे

Adv