सातारकरांची ओळख असलेला किल्ले अजिंक्यतारा येथे गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटक वनवा लावत असून यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महालक्ष्मी प्रतिष्ठानचे धनेश खुडे व सुरज गायकवाड यांनी केली आहे
सातारकरांची आन-बान शान असलेला किल्ले अजिंक्यतारा हा अलीकडच्या काळात वारंवार वनव्याने होरपळत असून किल्ले अजिंक्यतारा कायम अजिंक्य राहिला मात्र काही समाकंटकान मुळे याच अजिंक्य नावाला आग लावण्याचे प्रयत्न होत असून या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी महालक्ष्मी प्रतिष्ठानचे धनेश खुडे यांनी केली आहे
गेली दोन दिवस काही समाज कंटंकांनी आग लावली आगीचे रूपांतर विनव्यात झाले अनेक पशु पक्षी यांची होरपळ होताना समस्त सातार वासियांनी मनोमन हळहळ व्यक्ती केली त्यातच महालक्ष्मी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष ठिकानावर्ती जाऊन वनवा विजवन्याचे कार्य सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकञ येऊन पार पाडल्याने प्रतिष्ठानचे कौतुक शाहुनगर वासियांच्या मधुन होत आहे.