सातारकरांचे जीवनदायी ठरलेल्या कास धरणारची उंचीवाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे.धरणातील पाण्याची क्षमता০.१ टिएमसी वरुन ०.५ टिएमसीपर्यंत वाढली आहे. पूर्णतः गुरु त्वाकर्षणपध्दतीने उपलब्ध होणा-या पाण्याचा बाढणारा दाब
लक्षात घेता, सध्याच्या कास बंदिस्त पाईपलाईनच्या सुधारणे करीता सातारा नगरपरिषदेने अमृत २.० योजनेमधुन सुमारे ८७कोटी २१ लाख रुपयांच्या प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला तातडीने मंजूरी दयावी अशी आग्रही मागणी खा
श्रीमंत छ उद्यनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री ना. हरदीपसिंग पुरी यांचेकडे केली. सादर केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्याची कार्यवाही जलद करण्यात येईल असा शब्द ना.हरदीर्पासिंग पुरी यांनी यावेळी खाश्री छ उदयनराजेंना दिला आहे.
आज नवी दिल्ली, निर्माण भवन येथील गृरहनिर्माण व नगर मंत्रालयात,ना.पुरी यांची,खा श्री छउदयनराजे भोसले यांनी भेट घेतली, नगरपरिषदेच्या कारस बंदीस्त पाईपलाईनची सुधारणा व अनुषंगीक कामांचा सुमारे ८७ कोटी २१ लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजूरी देणेबाबत निवेदन दिल्यावर, जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, पाणी उचलण्याचा किंवा वाहुन नेण्याकरीता (लिफर्टींग व पंपिंगकोणताही खर्च नसलेल्या कास धरणामधून
गुरुत्वाकर्षण पध्दतीने (ग्रॅव्हीटी) आज रोजी १५ गावांसह सातारच्या निम्या भागाला पाणीप्रवठा होत आहे. अलीकडच्या
सुमारे २५ वर्षापर्यंत कास धरणातुन उधडया पाटाने पाणी येत होते. उघडया पाटामुळे पारणी जमिनीत मुरणे, पाट फुटणे,
पाट-पाण्यात कचरा मिसळणे, इत्यादी प्रकार होतअसत.त्याला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम १९९६-९७ च्या दरम्यान,
कृष्णा खारे विकास महामंडळाचे आम्ही उपाध्यक्ष असताना, कास बंदिस्त पाईपलाईनचे काम हाती घेवून मागी लाबले.
त्यामुळे पाण्याचा अधिक शुध्द व वाढीव पुरवठा उपलब्ध झाला. कास धरणातुन नैसर्गिकरित्या पाणी येत असल्याने, त्यास कोणताही खचर्च नाही म्हणून कास धरणाची उंची बाढवल्यास, सातारकरांना कायमरस्वरुपी बिनखचांचे पाणी उपलब्ध होईल हे लक्षात घेवून, कास धरणाची उंची वाढ़वण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार आज रोजी कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उंची बाढवल्याने, धरणातील पाणी साठी ०.१ टिएमसी वरुन, ০.५ टिएमसीपर्यंत बाढला आहे.धरणातुन येणा – या पाण्याचा दाब देखिल वाढला आहे. त्यामुळेच नगरपरिषदेने कास बंदिस्त पाईपलाईनची सुधारणा करण्याचा सुमारे ८७ कोटी २१ लाख रुपयांचा प्रस्ताव कैंद्राच्या अमृत २.० मधुन कैंद्राच्या नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाला सादर केला आहे.
सादर केलेल्या प्रस्तावामध्ये कास बंदिस्त पाईपलाईन सुधारणा करणे, फिल्टरेशन प्लॉन्टची क्षमता वाढवणे / नवीन
फिल्टरेशन टॅन्क साकारणे, नवीन साठवण क्षमता, आदी कामांचा समावेश आहे. या कामामुळे कास मार्गावरील १५ गावांसह सध्याच्या अर्धे शहर भागाऐवजी संपूर्ण सातारा शहराला कासचे पाणी ग्रेव्हीटीव्दारे बिनखर्चाचे उपलब्ध होणार आहे. कार्बन फु्टप्रिंट कमी होण्याबरोबरच वार्षिक सुमारे ३ कोटी रुपयांच्या सध्याच्या होत असलेला पाणीपुरवठा बीज विल खर्च वाचणार आहे. दरडोई प्रेशा दाबाने आवश्यक असणारे शुध्द पिण्याचे पारणी पुरवता येणार आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी प्रदान केली जावी अशी आग्रही मागणी आहे असेही यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना.पुरी यांना केली भेटीअंती ना. हरदीपसिंग प्री यांनी या लोकोपयोगी सुधारणा कामास अमृत २.० मधुन प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत त्यांच्या मंत्रालयातील अधिका-यांना पाचारण करुन जरुर त्या सूचना दिल्या आहेत. परिपूर्ण प्रस्ताव असल्याने,लवकरच प्रशासकीय मंजूरी मिळून, कास बंदिस्त पाईपलाईनच्या सुधारणेच्या आणि त्या अनुषंगाने अन्य कामांना सुरुवात करण्यात येईल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमुद केले आहे.





