सातारा व कराड शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही शहरांचे एन्ट्री पॉईंट आणि वर्दळीच्या ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी महत्त्वपूर्ण सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे या कामी तातडीने जिल्हाधिकारी उपलब्ध करावा अशी मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की सातारा व कराड दोन शहरे जिल्ह्याच्या नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची केंद्रबिंदू मानली जातात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व सातारा जिल्हा पोलीस यांच्या माध्यमातून सातारा व कराड शहरात येणाऱ्या सर्व मार्गासह दोन्ही शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवले जावेत तसेच कराड शहरांमध्ये वाहनांची नंबर प्लेट कॅच करतील असे उच्च दर्जाचे कॅमेरे बसवले जाणे गरजेचे आहे जेणेकरून सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पोलिसांना गरज पडली तपासाच्या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकेल .दोन्ही शहरालगत औद्योगिक महामंडळाचा परिसर आहे दोन्ही शहरांमधून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जातो येथील दैनंदिन उलाढाल व वाहतुकीची बद्दल प्रचंड प्रमाणात आहे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी सातारा शहरांमध्ये 35 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले होते पण बहुतांश कॅमेरे हे बंद आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा एक्सेस सातारा जिल्हा पोलिसांकडे आहे त्याचे नियंत्रण पोलीस मुख्यालयातून होत आहे सदरचे कॅमेरे कोणतीही घटना कॅप्चर करू शकत नाही
सातारा शहर व कराड शहर दोन्ही शहरांच्या एन्ट्री पॉइंटवर वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत एक जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता अधिनियम लागू झाला असून यामध्ये ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग सक्षम पुरावा ग्राह्य मानला गेला आहे त्यामुळे दोन्ही शहराचे शहरात येणारे रस्ते महत्त्वाची चौक संवेदनशील असणारी ठिकाणे यांचा पोलीस प्रशासनाने अहवाल मागवून तेथे हाय रिझोल्युशनचे एनपीआर कॅमेरे बसवले गरजेचे आहे त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्याने पुढील काळात जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये यंत्रणा कार्यान्वित करणे बाबत नियोजन करावे अशी स्पष्ट सूचना उदयनराजे यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना केली आहे .