नागरीकांनी त्यांचा कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्या दंडाची शास्ती. छ उदयनराजे

231
Adv

नागरीकांनी आपल्या व्यक्तीगत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत अरजेचे आहजेच तथापि सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून,नागरीकांनी केवळ घंटागाडीतच आपला कचरा टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य राखण्यास मदत होणार आहेत्र नगरपरिषदेला देखिल कचरा वाहून नेणे सोयीस्कर होणार आहे. तथापि आजही अनेक नागरीक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. कोणाही नागरीकांनी आपला कचरा उघडयावर, सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास,
अश्या नागरीकांना जबर दंडाची शास्ती लावली जाईल, नागरीकांनी आपला कचरा घंटा गडयांशिवाय कोठेही अन्यत्र टाकु नये असे आवाहन ज्जा सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

सातारा शहराचे सार्वजनिक आरोग्य मुख्यतः पसरणा-या कच-यामुळे धोक्यात येत असते. सध्याचा काळ महामारीचा काळ आहे. त्यामुळे व्यक्तीगत आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यसह शहराचे आरोग्य अबाधित ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सातारा नगरपरिषदेने कचरा उचलण्यासाठी इंपिंग पेसरच्या कुंडया ठेवल्या होत्या. त्यामुळे लोखंडी कुंडीत साठवलेला कचरा कुंडीसह वाहुन नेता येत असल्यामुळे कुंडीत साठलेला
कचरा कर्मचा-यांना गोळा करून गाडीत भरण्याचा व्याप वाचला होता. त्याही पुढे जावून, घरोघरी घंटा गाड्यांमार्फत कचरा गोळा करण्याची सर्वप्रथम सुरुवात पश्चिम महाराष्ट्रात सातारा नगरपरिषदेने केली. त्यामुळे कचरा साठुन न राहता, तातडीने तो डेपोवर पोहोचवला जावू लागला. तरी सुध्दा काही नागरीक कुटुंबे त्यांचा कचरा कचरा कुंडीत न टाकता, उघडयावर, ओढयात, रस्त्यावर टाकत आहेत. घंटागाडीशिवाय कचरा टाकणा-या अश्या नागरीकांवर कोणताही मुलाहिजा न बाळगता,पालिकेच्या माध्यमातुन जबर दंड आकारला
जाणार आहे. रस्त्यावर,ओढयावर, उघड्यावर कचरा टाकणा-या व्यक्तीचा, जागरुक नागरीकांनी फोटो काढून नगरपालिकेत पाठविल्यास, अशा जागरुक नागरीकांचे नांव गुप्त ठेवून, कचरा टाकणा-यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
येथुन पुढे कोणाही नागरीकांनी आपला कचरा घंटागाडीशिवाय अन्यत्र कोठे टाकू नये असे प्रथम जिनती आवाहन आहे अन्यथा सार्वजनिक हित आणि आरोग्याकरीता संबंधीतांबर कारवाई अटल आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv