जुना मोटर स्टँड परिसर ने घेतला मोकळा श्वास

373
Adv

जुना मोटर स्टँड वर गाड्यांचे गॅरेज असून वर्षानुवर्षे या गॅरेज मधील गाड्या व काही नागरिकांच्या बंद असलेल्या गाड्या सदरील रस्त्यावर उभ्या असलेल्या दिसून येत होत्या सदर गाड्यांच्या बाबतीत वृत्त प्रसिद्ध होताच सातारानामाच्या वृत्ताची सातारा जिल्हा पोलिस प्रमुख श्री अजय बंसल यांनी दखल घेऊन सदरील बंद असलेल्या गाड्या तात्काळ काढून कारवाई केली

जिल्हा पोलीस प्रमुख श्री अजय बंसल यांच्या कारवाईमुळे राधिका चौक व आसपास परिसरातील नागरिक यांनी त्यांचे आभार मानले असून सदरील कारवाई तात्पुरत्या स्वरूपात नसावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे सोशल मीडिया वरती प्रशांत मोदी यांनीही यासंदर्भात आवाज उठवला होता त्यांचेही नागरिकांनी आभार मानले आहेत

जुना मोटर स्टँड कडे जाणारा रस्ता संवेदनशील असून याच रस्त्यावर हॉस्पिटल, भाजी मंडई व पेट्रोलपंप असून रोज शेकडो नागरिकांची या रस्त्यावर ये जा असते त्यामुळे हा रस्ता अरुंद बनला होता मात्र जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांच्या कारवाईने सदर रस्ता मोठा झालेला असून ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपाची नसावी हीच अपेक्षा नागरिकांनी केली आहे

Adv