Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जिल्हा बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उद्या सांगता समारंभ

जिल्हा बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उद्या सांगता समारंभ

198
Adv

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. १५ ऑगस्ट २०२३ ते १५ ऑगस्ट २०२४ या काळात “गौरवशाली अमृत महोत्सव वर्ष “बँकेने साजरे केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीनकाका पाटील यांनी दिली.

सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण, कृषी, सहकारी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे केंद्रस्थान असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेप्रमाणे बँकिंग सेवेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास व प्रगती करत आहे. सात दशकाहून अधिक काळ कृषी सहकारी सेवेचे उत्तम व गुणात्मक कार्य केलेले आहे. “उद्धरेदात्मनात्मनम:” हे ब्रीद अंगीकारल्याने समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच बँकेचा विकास हे सूत्र जिल्हा बँकेमुळे यशस्वी झाले आहे.

बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

बँकेच्या या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री, आमदार शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, विद्याधर अनास्कर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. राजेंद्र सरकाळे, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, आमदार मकरंद जाधव (पाटील)

या प्रमुख मान्यवरांसह बँकेचे सर्व संचालक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमास विकास सोसायटी संचालक, शेतकरी, सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीनकाका पाटील यांनी केले आहे.

Adv