जिल्ह्यात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सबकुछ महायुती असे वातावरण असताना भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांना जल्लोष करण्यासाठी 25 पदाधिकारी सुद्धा जमेनात अशी अवस्था कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर जल्लोष करताना दिसून आली
मुंबई पुणे व इतर ठिकाणी एखाद्या पक्षाचा जल्लोष करताना शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असतात मात्र भाजपला फक्त 25 पदाधिकारी जमवता आले ही मोठी शोकांतिका आहे राष्ट्रवादीत अजित पवार गटाचा कधीही जल्लोष सातारा जिल्ह्यात झालेला नाही शिवसेना एकनाथ शिंदे गटाची ही अवस्था तशीच असून अशा आळशी पदाधिकाऱ्यांना पक्ष नेतृत्वाने घरी बसून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी खाजगी चर्चा तिन्ही पक्षातील कार्यकर्ते करत आहेत
ज्या जिल्हाध्यक्षांना 25 पदाधिकारी नागरिक जमवता येत नसतील तर संबंधित जिल्हाध्यक्षांना राज्यावर संधी देऊन सन्मान करावा तसेच जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेला भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीला जिल्हाध्यक्षपदावर संधी मिळाल्यास पक्षाची वाढ अजून होणार हे मात्र निश्चित
त्यामुळे आता लोकसभा विधानसभा निवडणूक झाली मंत्रिमंडळ विस्तार ही झाला आता या दोन्हीही निवडणुकीत प्रेम करणाऱ्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष पद मिळून या जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही विस्तार व्हावा अशी माफक अपेक्षा काही पदाधिकारी खाजगीत करत आहेत