नूतनी करण्याच्या कामामुळे जलमंदिर येथील भवानी मातेचे दर्शन बंद

90
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जलमंदिरपॅलेस येथील खाजगी देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आई श्री तुळजाभवानीमाता मंदिराचे सध्या नुतनीकरणाचे कार्य राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहे.

सदरचे नुतनीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याने, श्रध्दावान भविकांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी यंदाचे सन 2025 चे नवरात्रोत्सवात श्री भवानी मातामंदिर, भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आदरणीय राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांचे अनुज्ञेने घेण्यात आला आहे याची जरुर ती नोंद सर्व भाविकांनी घ्यावी असे आवाहन जलमंदिर
नवरात्रोत्सव व्यवस्थापनाने केले आहे.

तथापि पूर्वपार परंपरेने चालत आलेले आई तुळजाभवाने मातेचे सर्व सेवा उपचार पूजा-अर्चा विधिवतपणे करण्यात येणार आहेत असेही व्यवस्थापनाने कळविले आहे.

Adv