स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, हे स्वप्न उराशी बाळगून उरमोडी धरणाची पायाभरणी केली. आज धरण मोठ्या दिमाखाने उभे असून या धरणातील पाणी कालव्यांद्वारे तालुक्याच्या कानाकोपर्यात पोहचले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन उरमोडी धरणाचे पाणी शेतकर्याच्या शेतात पोहचवून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार केले आहे. सातारा आणि जावली तालुक्यात असंख्य बंधारे बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघात जल क्रांती घडवून आणली आहे. जावली सारख्या दुर्गम, डोंगराळ भागात ठिकठिकाणी बांधलेल्या बंधार्यांमुळे परिसरातील पाणी टंचाई कायमची दूर झाली आहे. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी बंधारे बांधले असून या बंधार्यांमुळे हजारो हेक्टर जमिनीला बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा शेतीसाठी नियोजनबध्द वापर होत असल्याने सातारा- जावली मतदारसंघ खर्या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला आहे. जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी बोंडारवाडी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून हे धरण लवकरच पुर्ण होणार आहे. सातारा शहरासह सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपुर्ण व्हावे, हे ध्येय ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. सातारा शहरालगत असलेल्या शाहुपूरी ग्रामपंचायतीला भेडसावणारा पाणीप्रश्नही नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोडवला आहे. शाहूपुरीसह दिव्यनगरी, कोंडवे, अंबेदरे, दरे बु. आदी गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. जावली तालुक्यातही याचपध्दतीने प्रत्येक गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून होत आहे.
Home Politics|Satara District Satara City जल सिंचनक्रांती चे जनक म्हणजे आ श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले..अरुण कापसे






