छ उदयनराजे मित्र समुहा तर्फे इंदिरानगर विलासपूर येथे मोफत लसीकरण मोहिम संपन्न

371
Adv

जय हनुमान मित्र मंडळ, इंदिरानगर श्री छ उदयनराजे मित्र परिवार युवा नेते संग्राम बर्गे मित्र समूह यांच्या प्रयात्नातुन विलासपूर ग्रामपंचायत कार्यालय आणि Z P शाळा इंदिरानगर, विलासपूर येथे लसिकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत भागातील 215 नागरिकांचे लसिकरण करण्यात आले असून लसीकरण उपलब्ध केल्याबद्दल येथील नागरिकांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाचे आभार मानले

सातारा शहराच्या हद्दवाढीत नुकताच समावेश झालेल्या विलासपुरच्या नागरिकांची लसिकरणसाठी ग़ैरसोय होत होती. नागरिकांची ग़ैरसोय टाळण्यासाठी विलासपूर भागातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवाराने वेळोवेळी प्रशासनाकडे या भागातील नागरिकंसाठी लसिकरण मोहिम सुरु करावी अशी मागणी केली होती, माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याची दखल घेऊन विलासपूर मध्ये लसीकरन मोहिम राबवावी अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी याना दिल्या, प्रशासनाने तात्काळ या सूचनांची अंमलबजावणी करत विलासपूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणि Z. P. शाळा इंदिरानगर येथे लसीकरन मोहिम राबवली. या लसिकरनासाठी भागातील नागरिक व महिला उपस्थित होत्या, दिवसभरात 215 नागरिकांचे लसिकरण करण्यात आले.

यापुढेही विलासपूर ग्रामपंचायत हद्दीतील इतर सर्व भागांमध्ये लसीकरण करण्यासाठी उदयनराजे मित्र परिवार आग्रही भूमिका घेत राहणार असून येथील नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणी साठी उदयनराजे मित्र समूह कटिबद्ध असल्याचे मत ही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले

Adv