हुतात्मा उद्यान येथील सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन

269
Adv

सातारा, दि. – येथील शाहुपुरीमध्ये असणा-या हुतात्मा उद्यानचे सुशोभिकरण आणि थोर स्वांत्र्यसेनानी रंगो बापूजी गुप्ते यांचे शिल्प बसवण्यास शाहुनगरी फौंडेशनला नगरपालिकेने मान्यता दिली होती. त्या कामाचे भूमिपूजन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संभाजीराव पाटणे, शाहुनगरी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या लढयाची खरी सुरुवात झाली ती 1857 च्या उठावापासून. या लढयामध्ये सातारा जिल्हयाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. सातारा शहरातील गेंडामाळ या परिसरात 8 सप्टेंबर 1857 रोजी स्वातंत्र्यासाठी 17 जण हुतात्मा झाले. त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे थोर स्वातंत्र्यसेनानी रंगो बापूजी गुप्ते. याठिकाणी हुतात्म्यांचे स्मृती जतन करण्यासाठी हुतात्मा उद्यान निर्माण करण्यात आले परंतु त्याचे सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. नव्या पिढीला ऐतिहासिक वारशांची माहिती व्हावी तसेच त्याचे जतन केले जावे यासाठी या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी नगरपालिकेकडे फौंडेशनच्यावतीने निवेदन करुन देण्यात आली होती. त्यानुसार नगरपालिकेने परवानगी दिली होती. सदरचे शिल्प शाहुनगरी फौंडेशन यांच्यामार्फत बसवले जाणार आहे. त्यासाठी नगरपरिषेदला कसलाही खर्च येणार नाही, फक्त शिल्पाची देखभाल नगरपालिकेमार्फत होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संभाजीराव पाटणे, फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री.छ.वृषालीराजे भोसले, शाहुनगरी फौंडेशनचे सदस्य आणि नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. संभाजीराव पाटणे म्हणाले, सातारा शहराला ऐतिहासिक महत्व आणि परंपरा असून त्याला उजाळा देण्याचे आणि जोपासण्याचे काम शाहुनगरी फौंडेशनच्या माध्यमातून होत असून ही आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा वारसा श्री.छ.वृषालीराजे भोसले आणि त्यांचे सहकारी पुढे नेत असून नवीन पिढीला ते मार्गदर्शक ठरले. भूमिपूजन कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, विवेक निकम, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, नगरसेवक कल्याण राक्षे, फौंडेशनचे सदस्य, सौ. रमनी अमित कुलकर्णी, सौ. चव्हान, सौ. फडके, सौ. बावकर, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Adv