हिलटॉप कॉलनी येथील पावसाच्या पाण्याने होणारे नुकसान उपनगराध्यक्ष शेंडे यांनी थांबवले पावसाच्या पाण्याने दगड माती कचरा डोंगर भागातून वाहून येत होता स्वतःजातीने हजर राहून शेंडे यांनी येथील काम मार्गी लावल्याने येथील नागरिकांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचे आभार मानले
अजिंक्यताराच्या पायथ्याला हिलटॉप कॉलनी असून दरवर्षी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने कॉलनी मध्ये दगड माती व कचरा वाहून येत असतो गेल्या दोन दिवसाच्या पावसानेही असाच कचरा वाहून आला होता येथील चरी सगळे तुडुंब कचऱ्याने भरले होते हिलटॉप कॉलनी येथील नागरिक सागर भोसले व अन्य नागरिकांनी सकाळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याशी संपर्क साधला उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे एक तासाच्या आत जेसीबी घेऊन तिथे आले व स्वतः उभे राहून जेसीबीच्या साह्याने तासाभराच्या आतच सर्व चरी व रस्ता मोकळा करून दिला त्यांच्या या कामाने येथील नागरिकांनी उपनगराध्यक्ष शेंडे यांचा छोटेखानी सत्कार देखील केला
हिलटॉप कॉलनीची ही अडचण वर्षानु वर्षे रखडलेली होती, मात्र आता कॉलनीतील खूप मोठी अडचण दूर झाल्याने नागरिकांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सातारा विकास आघाडीचे ही धन्यवाद मानले असून येणाऱ्या पावसाळ्यात आम्हाला काही अडचण नसल्याचे सूतोवाचही कॉलनीतील नागरिकांनी यावेळी व्यक्त केले