शाहूनगर व प्रभाग क्रमांक19 मधील तक्रारींसाठी सागर भोसले यांनी सुरू केला हेल्पलाइन नंबर

296
Adv

शाहूनगर परिसरातील व प्रभाग क्रमांक 19 मधील तक्रार निवारणासाठी जय सोशल फाउंडेशनच्यावतीने हेल्पलाइन नंबर सुरू केला असल्याची माहिती जय सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वा सागर भोसले सर यांनी सातारानामाशी बोलताना दिली

शाहूनगर व प्रभाग क्रमांक 19 मधील तक्रार निवारणासाठी जय सोशल फाउंडेशनच्या वतीने 9021115004 हा हेल्पलाईन नंबर सुरू केला असुन नागरिकांना कोणत्याही कारणासाठी कोणत्याही शासकीय कार्यालय येथे न जाता फक्त एक फोन करून आपली तक्रार सदरच्या नंबर वरती नोंद करणे आवश्यक असून येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचा निपटारा हा केला जाणार असून यासाठी हा हेल्पलाईन नंबर सुरू केला असल्याचे सागर भोसले यांनी यावेळी सांगितले

हेल्पलाइन नंबरचा उपयोग या भागातील नागरिकांसाठी प्रचंड होणार असून हेल्पलाइन नंबर सुरू केल्याने शाहूनगर व प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांनी जय सोशल फाउंडेशन व सागर भोसले यांचे कौतुक केले आहे

Adv