हद्दवाढीतील भागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही खा श्री छ उदयनराजे भोसले यांची ग्वाही

561
Adv

सातारा नगरपरिषद ही नागरीकांची संस्था आहे.या मातृसंस्थेच्या माध्यमातुन जनतेच्या मुलभुत गरजांची पूर्तता करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच
खर्चावर बंधने- मर्यादा येत असल्या तरी प्रामुख्याने हद्दवाढ झालेल्या भागाचा मुलभुत विकास साधण्याचा प्रामणिक प्रयत्न सातारा विकास आघाडीच्या माध्यमातुन आम्ही करीत आहोत. त्यासाठी लागणारा निधी राज्य आणि केंद्राकडून उपलब्ध करुन घेणे,नगरपरिषदेच्या स्वनिधीतुन विकास साधणे असे विविध प्रयत्न सुरु आहेत. हद्दवाढ झालेल्या ठिकाणी आम्ही विकासा करीता कुठेही कमी पडणार नाही असे मत सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

सातारा नगरपरिषदेच्या शाहुपूरी भागातील विविध विकास कामांचे भुमीपूजन लोकार्पण कार्यक्रमात ते अनौपचारित बोलत होते. यावेळी तत्कालीन शाहुपूरी ग्रामपंचायतीचे सरपंच व
ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती माजी सदस्य संजय पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सिध्दार्थ निकाळजे, नगरपरिषदेचे विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक,नगरसेविका,नगरपरिषदेचे
अधिकारी, प्रमुख उपस्थित होते.सातारा नगरपरिषद ही अ वर्ग नगरपरिषद आहे. जिल्हयातील सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून
सातारा नगरपरिषदेकडे पाहीले जाते नुकतीच हद्दवाढ झाल्याने, सातारा नगरपरिषदेच्या हद्दीचा विस्तार होण्याबरोबरच जबाबदारी देखिल वाढली आहे. नगरपरिषद हद्दीत समाविष्ट झालेल्या
भागातील नागरीक पूर्वीपासूनच मनाने सातारा शहराशी एकरुप झालेले होते. पूर्वी देखिल अत्यावश्यक नागरी सेवा या भागात सातारा नगरपरिषद अपवादात्मक परिस्थितीत पुरवित होती. या भागातील संपूर्ण कचरा, सातारा नगरपरिषदेच्या मालकीच्या सोनगांव कचरा डेपोवरच टाकला जात होता. आता रितसर
हद्दवाढ झाल्याने, या भागातील नागरीकांना सोयी-सुविधांसाठी नगरपरिषदेला विचारणा करता येणार आहे. त्यामुळे निश्चितच नगरपरिषदेची जबाबदारी वाढली आहे. म्हणूनच हद्दवाढ भागाला प्राधान्य देण्यात येवून येथील रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, बंदिस्त गटर्स, आदी सुविधा पुरविणेत येत आहेत
असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगीतले. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्याहस्ते खालील कामांचा लोकार्पण/शुभारंभ करण्यात आले.

१. श्रीराम कॉलनी ते गुरुप्रसाद कॉलनी, शाहुपूरी पोलीस स्टेशन रस्ता रुंदीकरण कामाचे भुमीपूजन.
तसेच श्रीराम कॉलनी अंतर्गत बंदिस्त गटर्स बांधण्याचे भुमीपूजन.
२.पवार कॉलनी मेन रोड रस्ता रुंदीकरण कामाचे भुमीपुजन आणि पवार कॉलनी अंतर्गत बंदिस्त गटर
कामाचे भुमीपूजन
३.गुलमोहर कॉलनी आयटीआय रोड ते वैष्णवी देवी मंदिर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण भुमीपूजन.
पार्कीग शेडचे लोकार्पण
४.चिंतामणी सोसायटी येथील बंदिस्त गटर कामाचा लोकार्पण सोहळा
५.जयविजय कॉलनी ते देशपांडे मारुती मंदिर ते आगवेकर घर रस्ता डांबरीकरणाचा लोकार्पण सोहळा
व बंदिरस्त गटर कामाचे लोकार्पण
६.आझाद नगर चिंतामणी सोसायटी ते भंडारी घर गटर काम तसेच देशपांडे ते कुलकर्णी घर
आझादनगर बंदिस्त गटर काम लोकार्पण सोहळा
७.पेंडसेनगर आयटीआयरोड ते भापकर घर रस्ता डांबरीकरणाचा तसेच बंदिस्त गटर कामाचे लाकार्पण
८.मोळाचा ओढा सावंत घर ते मोळाचा ओढा चौक बंदिस्त गटर कामाचा लोकार्पण सोहळा
९.सर्वोदय कॉलनी काकडे वस्ती येथील काकडे घर ते नामदेव शिंदे घर रस्ता डांबरीकरण कामाचे
लोकार्पण.
यावेळी शाहपूरीतील बहुसंख्य नागरीकांसह याभागातील अमित कुलकर्णी, सौ.मुग्धा पुरोहित, गणेश आरडे,अनिरुध्द दाभाडे, रमेश धुमाळ, राजेंद्र गिरीगोसावी,अमृता प्रभाळे, जवानमल जैन,सतीश कदम, अजित ग्रामोपाध्ये,भैरव चव्हाण, सुरेश साधले, प्रविण औसेकर,पोतदारसर,मनिषा फरांदे,बगाडेकाका, रवि शिवणकर, प्रविण शिंदे,अभिजीत गाडे, किरण वाघमोडे, नासिर सययद, उमेश साळुखे, आबा इंगवले,सिकंदर पाटोळे, दिपक घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Adv