हद्दवाढीतील क्षेत्राच्या विकासासाठी 48 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी

596
Adv

सुमारे दिडवर्षापूर्वी झालेल्या सातारा नगरपरिषदेच्या हद्वाढीत समाविष्ट झालेल्या भागातील विविध कामांसाठी सातारा नगरपरिषदेने सुमारे ५१ कोटी रुपयांचा विस्तृत विकास आराखडा तयार केला होता. त्यास नगरपरिषदेच्या जनरल कौन्सिलची मंजूरी घेवून, सदरचा विकास आराखड्यानुसार विशेष निधी मिळण्याबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्तावित करण्यात आले होते. याकामी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची आम्ही समक्ष भेट घेवून याचा सतत पाठपुरावा
केला. हद्दवाढ भागातील नागरीकांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहीजेच ही आमची समाजकेंद्रीत धारणा आहे. आमच्या या
प्रयत्नांना यश आले असून, शासनाकडून ४८ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी मिळालेली आहे. या निधी पैकी पहिला हप्ता लवकरच नगरपरिषदेला प्राप्त होईल.

दरम्यान गत महिन्यात ५८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीस मंजूरी मिळुन, पैकी १० कोटीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आणि आज ४८ कोटींच्या हद्दवाढ भागातील कामांना मंजूरी प्राप्त झाली आहे. चैत्र शुध्द पाडव्याच्या
नववर्षाच्या निमित्ताने समतोल आणि ठोस विकासाकरीता सातारकर नागरीकांना डबल धमाका-विशेष भेट दिली आहे अशी प्रतिक्रीया नागरीकांमधुन व्यक्त होत आहे.

शाहुपूरी, शाहूनगर, विलासपूर, खेड, येथील भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झाला. बहुप्रतिक्षित हवाढ झाल्याने आमच्यावरीत
जबाबदारी देखिल वाढली होती. प्रत्येक कुटुंबाला मुलभुत सुविधा मिळाल्याच पाहीजेत किंबहुना सार्वजनिक सोयी सुविधांच्या
माध्यमातुन त्यांचे राहणीमान अधिक सुखद झाले पाहीजे याच जा विचारांचा विरोध नसलेले/असलेले प्रत्येक कुटुंब आमच्या परिवारातीलच आहे अशी आमची प्रामाणिक भावना असल्याने, याभागाच्या सर्वांगिण विकासाकरीता, सातारा नगरपरिषदेने हद्दवाढ भागातील परिसराची सुक्ष्म पहाणी करुन, तेथील आवश्यक असलेल्या कामांचा खाली
नमुद केलेप्रमाणे आराखडा तयार केला.

हद्दवाढ भागातील, ३.७५ मिटर रुंदीचे ६ कोटी ५६ लाख।

५.५० मिटर रुंदीचे रस्ते रुपये ७ कोटी ४५ लाख.

७.५० मिटर रुंदीचे २ कोटी ९४ लाख रुपयांचे रस्ते.

हद्दवाढ ३.७५ मिटर रुंदीचे रुपये ४ कोटी ७३ लाखांचे नवीन रस्ते.

५.५० मिटर रुंदीचे ३कोटी ३३ लाखांचे नवीन रस्ते.

७.५० मिटर रुंदीचे नवीन रस्त्यांसाठी रुपये ८८ लाख रुपये ४०० बाय ६०० मापाचे आरसीसी गटर्स रुपये ६ कोटी ७० लाख.

६०० बाय ७५० मापाचे आरसीसी गटर्स करणेकामी रुपये ३ कोटी ४७ लाख.

विविध ठिकाणी स्ट्रीट लाईटस उभारणेकामी रुपये ३ कोटी ४८ लाख.

मोकळ्याजागांचा विकास आणि वृक्षारोपण करणेकामी रुपये ४ कोटी ६३ लाख, आणि
सुमारे ४ कोटी ३३ लाखांचे अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करणेची विविध कामे प्रस्तावित करण्यात आलेली होती.

आता राज्यशासनाकडून याकामी ४८ कोटीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे. लवकरच यापैकी पहिल्या हप्त्याचा निधी नगरपरिषदेस प्राप्त होणार आहे. हद्दवाढ भागाचा समतोल विकास साधताना, बचतगटांच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरण, रोजगार निमिर्ती, बाग-बगिचे आणि उद्याने विकसित करणे, दर्जेदार रस्ते-गटर्स, पाईपड्रेन, स्ट्रीट लाईटस् इ.कामांबरोबरच शाश्वत विकासाची कामे मार्गी लावण्यात येतील. मंजूर हद्दवाढ विकास प्रकल्पानुसार प्रशासकीय कार्यवाही करुन, लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.

आता राज्यशासनाकडून याकामी ४८ कोटीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे. लवकरच यापैकी पहिल्या हप्त्याचा निधी नगरपरिषदेस प्राप्त होणार आहे. हवाढ भागाचा समतोल विकास साधताना, बचतगटांच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरण, रोजगार निमिर्ती, बाग-बगिचे आणि उद्याने विकसित करणे, दर्जेदार रस्ते-गटर्स, पाईपड्रेन, स्ट्रीट लाईटस्
इ.कामांबरोबरच शाश्वत विकासाची कामे मार्गी लावण्यात येतील. मंजूर हद्वाढ विकास प्रकल्पानुसार प्रशासकीय कार्यवाही करुन, लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.

Adv