रामराव पवार नगर वसाहती मधील जिल्हा परिषदेची शाळा इमारत तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी दस्तूर खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे उदयनराजे यांनी बुधवारी समीर शेख यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर केले यावेळी उदयनराजे यांचे समर्थक आणि युवा उद्योजक संग्राम बर्गे यावेळी उपस्थित होते
जिल्हा परिषदेची शाळा जुनाट झाली असून भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत त्यामुळे नवीन इमारत बांधणे अत्यावश्यक बनले आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोडोली आणि विलासपुर परिसरातील अनेक गरजू आणि गरीब घरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांची इमारतीची गरज पाहता येथे नवीन इमारत बांधणे आवश्यक झाले आहे
सदरची शाळा आणि त्याची जागा ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असून त्याकरता पोलीस प्रशासनाचा ना हरकत दाखला सातारा जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक आहे आपल्याकडून यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ ज्ञानेश्वर खिलारे यांना सादर व्हावे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे नमूद केली आहे