गोलबाग ते देवी चौक रस्त्याची नगराध्यक्ष यांनी केली पाहणी

28
Adv

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी गोलबाग ते देवी चौक या राजपाथाची पाहणी केली यावेळी विद्यमान उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर नियोजन सभापती अशोक शेडगे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सुजाता राजे महाडिक उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले होते

व्यापारी मार्गावरील रस्त्याच्या पाहणीच्या दरम्यान व्यापाऱ्यांचे हित पाहणारे ते नगरसेवक मात्र या पाहणी दरम्यान आवर्जून उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे रस्ता सुशोभीकरण करणे गरजेचे असून व्यापारी पेठेतच पार्किंगची बोंबाबोंब असल्याने याकडे व्यापारी हित पाहणारे नगरसेवक व पालिका लक्ष देणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे

रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर, विद्युत व्यवस्था त्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे असे श्री अमोल मोहिते यांनी सांगितले.
सदर वेळी आरोग्य सभापती धनंजय जांभळे नगरसेवक जयवंत भोसले नगरसेविका प्राची शहाणे नगरसेवक सागर पावशे, पंकज चव्हाण,सुनील कुमार भंडारे चिद्रे साहेब,दहिफळे साहेब,वाठरे साहेब, तसेच एमएसईबीचे अधिकारी उपस्थित होते.

Adv