सातारा शहराच्या पूर्वेला गोडोली परिसरात असणाऱ्या गोडोली तलावाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र शासनाच्या अमृत-2 योजनेतून तब्बल साडेचार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे या निधीमधून तलावासाठी विविध सुविधा निर्माण दिल्या जाणार आहेत
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भातील योजनेची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की केंद्र शासनाच्या अमृत योजनेमधून गोडोली तलावाच्या सुशोभीकरणासाठी साडेचार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्रीय जनशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नुकतीच मंजुरी दिली .या निधीमधून तलावातील गाळ काढणे, तळ्याच्या बाजूने पाथवे तयार करणे, मजबूत संरक्षक भिंत बांधणे, तळ्यामध्ये कारंजे उभारणे, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, बगीचा, जिम आणि वाचनालय इत्यादी सुविधा दिल्या जाणार आहेत
साडेचार कोटींचा निधी लवकरच नगरपालिकेला प्राप्त होणार आहे साताऱ्याच्या दक्षिण आणि आग्नेय बाजूने प्रवेश करताना गोडोली येथे ऐतिहासिक गोडोली तलाव आहे या तळ्याला पूर्वी फारसे चांगले स्वरूप नव्हते मात्र गोडोली येथील रहिवाशांनी यंत्रणांमार्फत आणि लोकसहभागातून मोठा तलाव निर्माण केला आहे येथील तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण व्हावे याकरिता केंद्र शासनाकडे आमच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दिला असून हा निधी लवकरच सातारा नगरपालिकेला प्राप्त होणार आहे या योजनेला अमृत 2 या योजनेतून मंजुरी मिळाली असून गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली आहे या सुविधांमुळे सातारकरांना गोडोली तलावाला भेट देऊन तेथील सुविधांचा एक वेगळा आनंद उपभोगता येणार आहे सातारकरांच्या विविध सुविधांसाठी जास्तीत जास्त केंद्र शासनाचा निधी आणि हा आमचा उद्देश्य आहे . त्यानुसार पुन्हा केंद्राकडून साडेचार कोटींचा निधी उपलब्ध होत असल्याने या निर्णयाचे समाधान आहे अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार शेवटी दिली आहे






