सातारच्या आयुर्वेदिक गार्डन मध्ये उभारणार स्पर्धा परिक्षांसाठी सुसज्य लायब्ररी आणि अभ्यासिका.

218
Adv

सातारच्या आयुर्वेदिक गार्डनमध्ये रुपये 75 लाखांच्या अंदाज पत्रकीय रक्कमेची स्पर्धापरिक्षांना उपयुक्त ठरणारी सुसज्य लायब्ररी आणि अभ्यासिका लवकरच साकारणार असून, याकरीता स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तो निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या दरम्यान युवकांना दिलेला शब्द सार्थ ठरणार आहे.आयुर्वेदिक गाईनमध्ये उभारण्यात येणारी सुसज्य लायब्ररी आणि सुनियोजित अभ्यासिका ही युवक वर्गाला पुढील भविष्यासाठी उपयुक्त ठरणारी अनोखी भेट आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आम्ही महाविद्यालयांना भेटी देवून, युवकांशी चर्चा केली त्यावेळी युवकांच्या समस्यांविषयी चर्चा करताना, स्पर्धापरिक्षाचा अभ्यास आणि त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भग्रंथ यांची युवकांना कमतरता आहे असे जाणवले त्याच अनुषंगाने सुसज्ज अभ्यासिका आणि लायब्ररी व्हावी अशी युवक वर्गाची अपेक्षा अनेकमहाविद्यालयीन युवकांनी व्यक्त केली होती.त्या बाबत पाठपुरावा करुन सातारा नगरपरिषदेच्या मालकीच्या असणा-या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज आयुर्वेदिक गार्डन मध्ये लायब्ररी आणि अभ्यासिका उभारणेचे काम हाती घेण्यात आले. आयुर्वेदिक गार्डनमध्ये सुमारे 4 हजार स्के फुटाचे बांधकाम उभारुन सुसज्ज लायब्ररी आणि स्पर्धापरिक्षा अभ्यासिका साकारण्यात येणार आहे. त्यासाठी रुपये 75 लाखाचे अंदाजपत्र तयार करण्यात आले असून, स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध करुन घेण्यात आला आहे. आयुर्वेदिक गार्डनमध्ये असणारे शांत, निसर्गसंपन्न आणि प्रसन्न वातावरण, अभ्यासिकेत येणा-या प्रत्येकाच्या प्रयत्नांना सहाय्यभुत असणार आहे. एमपीएससी, युपीएससी, आणि तत्सम स्पर्धा परिक्षांकरीता हायटेक लायब्ररी, ई लायब्ररी, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, एक-दोन दिवसीय चर्चासत्रे, शिबीर, नामवंत वक्त्यांची व्याख्याने इ. विधायक आणि स्पर्धा परिक्षांना पुरक ठरणारे उपक्रम याठिकाणी राबविले जाण्याची सुविधा निर्माण होणार आहे.

अनेक महाविद्यालयांना मध्यवर्ती असलेल्या आणि बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरणा-या आयुर्वेदिक गाईनमधील लायब्ररी आणि अभ्यासिका यांचा अनेक तरुणांना निश्चितच ध्येय पूर्तीच्या वाटचालीस उपयुक्त ठरणार आहे.

Adv