मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय केंद्रस्थानी सातारा जिल्हा आला आहे मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवावरचे सर्व निर्बंध काढून टाकत गणेश भक्तांना मोठा दिलासा दिला राज्यातील सर्व गणेश मंडळांना एक खिडकी योजना अंतर्गत परवानगी देण्याच्या स्पष्ट सूचना देऊनही सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाभावी कोठेही एक खिडकी योजना राबवण्यात आलेली नाही त्यामुळे मंडप परवान्यापासून ते वीस मीटरच्या कनेक्शन पर्यंत अगदी गणेश मंडळाच्या नोंदणीसाठी सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्रिस्थळी यात्रा करण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गणेश मंडळ कार्यकर्त्यांची सातारा जिल्ह्यामध्ये विनाकारण ससे होलपट सुरू आहे 
सातारा जिल्ह्यात नोंदणीकृत तब्बल पावणेचार हजार मंडळी असून सातारा शहरांमध्ये गणेश मंडळांची संख्या 233 इतकी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 जुलै रोजी सह्याद्री येथील अतिथीगृहांमध्ये राज्यातील गणेशोत्सव मंडळाच्या अनुषंगाने एक लाईन ऑफ ॲक्शन ठरवून दिली होती यामध्ये गणेशोत्सवावर असणारे संपूर्ण निर्बंध त्यांनी हटवले होते गणेश मंडळाला लागणाऱ्या सर्व परवानग्या स्थानिक स्वराज्य संस्था कार्यक्षेत्रामध्ये एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात याव्यात असे त्यांनी स्पष्टपणे आदेश देऊन तसे त्यांनी सोशल मीडियावर जाहीरही केले होते मात्र सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाची पूर्णतः वासलात लावण्यात आली आहे सातारा शहरातील गणेश मंडळांना नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे वीज मीटर कनेक्शन साठी परवानगी वीज वितरण कंपनीकडे मंडप परवाना नगरपालिकेकडे तर स्पीकर परवाना पोलीस स्टेशन कडे असे चार ठिकाणी चार हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा या सर्व परवानग्यांमध्ये सुसूत्रता आणण्यात यावी अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली होती जिल्हा प्रशासनाने सुद्धा यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश महसुली यंत्रणांना दिले होते मात्र साताऱ्यात एक खिडकी योजनेचा पूर्णतः बोऱ्या वाचला आहे धर्मादाय आयुक्त कार्यामुळे कार्यालयांमध्ये अनेक गणेश मंडळाच्या परवानग्या पेंडिंग असल्याने परवानगीच नसल्यामुळे गणपती बसवणार कसा अशी चिंता मंडळाच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे अगदी सीसीटीव्ही कॅमेरा च्या परवान्या सुद्धा तांत्रिक कारणास्तव अडकले आहेत मुख्यमंत्री आदेश देऊनही जर महसूल यंत्रणा मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकावून लावत असेल तर अशा परवानग्यांचा उपयोग काय असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांचा आहे साताऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सार्वत्रिक संतापशी गेला असताना आणि योगायोग म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः दोन दिवस महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा यंत्रणा महसूल विभाग यांचा सावळा गोंधळ समोर आला आहे
एक खिडकी योजनेच्या परवानगी चे घोडे नक्की कोठे अडले हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही सरकारी बाबूगिरीचा हा उत्तम नमुना म्हणावा काय असा सात्विक संताप गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे गणपती आगमनाला केवळ तीन दिवस उरलेले आहेत अशा वेळी जर परवानग्या तांत्रिक कारणास्तव जर रखडवून ठेवण्यात आल्या तर उपयोग काय त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांच्याच आदेशाला जर किंमत नसेल तर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा काय आदर्श स्थापित करणार अशी उपयोजित चर्चा या निमित्ताने रंगू लागली आहे
धर्मादाय आयुक्तचा मंडळांना आडमुठेपणा
सातारा जिल्हा धर्मादाय आयुक्तांनी यंदाच्या वर्षी गणेश मंडळांना वेगळाच नियम लावला होता प्रथम संबंधित नगरपालिका अथवा ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला आणा तरच तुम्हाला परवानगी मिळेल असा हुकूमच एक प्रकारे त्यांनी राबवला होता या निर्णयाने जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांन बद्दल अनेक गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली याकडे जिल्हाधिकारी व प्रशासनाने पूर्ण कानाडोळा केल्याचे दिसून आले





