महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्काने ऑनलाइन अर्ज भरण्यास 5 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये बारावीची परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी कला, वाणिज्य, विज्ञान या सर्वच शाखांमधील नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची मुदत 21 ऑक्टोबर रोजी संपली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषयक, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडीटचे विषय घेणारे विद्यार्थी आदींना अर्ज भरण्यासाठी 22 ऑक्टोबरपासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.





