जिल्हा बँकेला विक्रमी १३८ कोटींचा नफा चेअरमन नितीन पाटील

266
Adv

सातारा जिल्हा बँकेला २0२१-२२ या आर्थिक वर्षाअखेर बॅंकेला इतिहासात सर्वाधिक १६३ कोटी ७० लाख रुपयांचा करपूर्व नफा झाला आहे. बॅंकेने २५ कोटी ५२ लाख रुपये आयकर भरला असून १३८ कोटी १७ लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ नफा हा ६७ कोटी रुपये असून राखीव निधीसाठी २0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी सभासद संस्थांना या नफ्यातून १२ टक्के लाभांश देण्यासाठी २८ कोटी ३३ लाखांची तरतूद केली आहे. एक ते तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर दोन टक्के व्याज परतावा दिला जाणार आहे. शेतकरी सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक कर्ज शुन्य टक्क्याने देण्यासाठी एक कोटी नऊ लाख ४० हजार रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली आहे.

जिल्हा बँॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेस बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रदिप विधाते, राजेंद्र राजपुरे, प्रभाकर घार्गे, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, रामभाऊ लेंभे, दत्तानाना ढमाळ, ज्ञानदेव रांजणे, शिवरुपराजे खर्डेकर, सुनिल खत्री, सुरेश सावंत, लहुराज जाधव आदी उपस्थित होते.

नितीन पाटील म्हणाले, कोरोनाच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत बँंकेने इतिहसातील सर्वाधिक नफा मिळवला आहे. बॅंकेच्या ठेवी ९१२२ कोटी तीन लाखांच्या असून कर्ज वाटप ५११२ कोटी ८१ लाख आहेत. बॅंकेच संमिश्र व्यवसाय १४ हजार २३४ कोटी ८४ लाख रुपयांचा झाला आहे. स्वनिधीसा ६९ कोटींची भरीव तरतूद केल्यामुळे आता बॅंकेकडे ७३९ कोटी सात लाखांचा स्वनिधी झाला आहे.
इतर बॅंकांमध्ये सुरक्षित गुंतवणूक ५१९४ कोटी ३२ लाखांची केली आहे. ढोबळ एनपीए १० कोटी चार लाखांचा असून कर्जाशी हे प्रमाण 0.२० टक्के आहे. ढोबळ एनपीएचे प्रमाण देशाती सर्व बॅंकामध्ये कमी आहे. गेली १५ वर्षे नेट एनपीए शुन्य टक्के राहिला आहे.
नफ्यातून सभासदांसाठी बँकेने काही तरतूदी केल्या आहेत, यामध्ये एक ते तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर दोन टक्के व्याज परतावा दिला जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना अल्प मुदतकर्जावर १३ वर्षांपासून व्याज परतावा दिला जात आहे. अल्पमुदत कर्जावर अडीच टक्के व्याज परतावा देण्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. शेतकरी सभासदांच्या पाल्यांच्या उचच शिक्षणासाठी कर्जावर व्याज परतावा देण्यासाठी एक कोटी नऊ लाख ४० हजारांची तरतूद केली असून हे कर्ज शुन्य टक्के व्याजाने प्राप्त होणार आहे.
विकास संस्था सभासदांना मध्यम व दिर्घ मदुत कर्ज वसुलपात्र हप्त्यावर सह टक्के व्याज सवलत दिली आहे. ६८ योजनांना याचा लाभ मिळणार आहे.
…………….
चौकट

बँक अमृत महोत्सवात विविध कार्यक्रम
२०२४ मध्ये बँॅंकेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने बॅंक अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली आहे.
……………
बँकेच्या ठळक वैशिष्टय : शंभर टक्के वसुली सोसायट्यांना २९ हजार ७०० रुपयांचे प्रोत्साहन. संस्था पातळीवर वसुली करणाऱ्या सोसायटींना २० हजार. गोडाऊन, इमारत बांधकामासाठी शुन्य टक्केने कर्ज. सचिवांना बक्षिस पगारासाठी १.६५ कोटींची तरतूद. ९५६ पैकी ९१३ सोसायट्या नफ्यात आणल्या. कर्मचाऱ्यांना दोन पगार सानुग्रह अनुदान, एक पगार बक्षिस. ढोबळ नफा ६७ कोटी, राखीव निधीसाठी २०.५६ कोटींची तरतूद. संशयित, बुडित कर्जासाठी ३९.२२ कोटींची तरतूद.

Adv