नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची सातार्यात जोरदार निदर्शने

234
Adv

राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा राज्य शासनाने तत्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपा सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली बहुसंख्य आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले यावेळी मोठा पोलिस फौजफाटा बंदोबस्तासाठी घटनास्थळी तैनात होता. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभि चव्हाण भोसले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, शहराध्यक्ष विकास गोसावी,राजेंद्र इंगळे, श्रीहरी गोळे,संतोष जाधव एकनाथ बागडी, महेश जाधव, बजरंग गावडे, धनंजय माने, सागर माने,रोहिदास पिसाळ,शिवाजीराव शिंदे, अलंकार सुतार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार,चंद्रशेखर वडणे ,भरत मुळे, महेंद्रकुमार डुबल, सचिन घाटगे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जयकुमार शिंदे, सतिश भोसले, मनिषाताई पांडे, प्रियाताई नाईक, अमोल सणस, नंदकुमार यादव, नगरसेवक सौ प्राची शहाणे, धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, चिटणीस यशवंत लेले,सुनिल जाधव,शहर सरचिटणीस जयदीपजी ठुसे प्रविण शहाणे, विक्रांत भोसले, विक्रम बोराटे सर्व जिल्हा व मंडल पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या आंदोलनाला उपस्थित होते आंदोलकांनी सुरुवातीला बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा आयोजित केला होता मात्र या मोर्चाला सातारा पोलिसांनी आक्षेप नोंदवल्याने मोर्चा रद्द करून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते.
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची यावेळी मागणी करण्यात आली. मलिक यांना प्रवर्तन संचालनालय यांनी अटक केली असून 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे जर मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो तर दुसऱ्याचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारिणीने या दरम्यान उपस्थित केला. जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात अल्पसंख्यांकांना दुखवायचे नाही म्हणून राष्ट्रवादीकडून हा राजीनामा घेतला जात नाही मात्र 1993च्या बॉम्बस्फोटात ज्यांचे बळी गेले त्यांच्याविषयी भाजपच्या अतिशय संवेदनशील भावना आहेत. मात्र मुंबई बाॅम्बस्फोटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची कृत्ये आम्ही खपवून घेणार नाही त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू अशी थेट भूमिका जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मांडली यावेळी बहुसंख्येने आंदोलकांनी प्रचंड पोलिस बंदोबस्तात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हा प्रशासनाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती सरदेशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले.

Adv