Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City दादा महाराज क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

दादा महाराज क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

411
Adv

24/02/25
       जीवनामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये युवकांना आपले करिअर निवडावयाची संधी आहे. महाराष्ट्रीयन युवकांना क्रीकेट क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी एक संधी किंवा प्लॅटफार्म उपलब्ध करुन देण्याच्या मुख्य उद्देशाने स्व. दादामहाराज क्रीकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेरणा घेवून अनेक दिग्गज खेळाडू देशाला मिळतील असे गौरवोद्गार सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
       छत्रपती शाहू क्रीडा संकूल ( छ.शाहू स्टेडियम,सातारा )येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. दादा महाराज उर्फ प्रतापसिंहमहाराज दिवस-रात्र टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या दरम्यान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे अनौपचारिक बोलत होते.
       स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक सुरगणा संस्थान-नाशिकचे श्रीमंत यशराजे( यश बाबा) पवार यांच्या हस्ते करण्यात आल्यावर मयुर क्रीकेट क्लब,सातारा विरुध्द श्रीदत्त परिवार वाढे, संघ ब, यांच्यामध्ये अतिशय रंगतदार झालेल्या हा सामना मयुर क्रीकेट क्लबने जिंकून स्व.दादा महाराज चषकावर आपले नाव कोरत रुपये 3 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले तर श्रीदत्त परिवार वाढे, संघ ब, हे  उपविजेता ठरल्याने या संघाला रुपये 2 लाखांचे पारितोषिक आणि  व्दितीय क्रमांकाचा दादामहाराज चषक  प्रदान करण्यात आले.
        तत्पूर्वी उपात्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या जनाई-मळाई क्रीकेट क्लब खिंडवाडी आणि सचिन आप्पा साळुंखे मित्रसमुह, देगांव या दोन संघामध्ये रुपये 1 लाखाचे पारितोषिक आणि चषक विभागुन देण्यात आले.
        सातारा जिल्हा क्रीकेट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सन 2025 च्या स्व.दादामहाराज चषक क्रीकेट स्पर्धेचे आयोजन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेने उदयनराजे मित्रसमुहाने अत्यंत नेटकेपणाने केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुन आलेल्या एकूण 90 क्रीकेट संघांनी भाग घेतला होता. स्पर्धा दिनांक 7 फेब्रूवारी 25 पासून सलग दररोज रात्री  पांच ते सहा सामन्यांमध्ये खेळवण्यात आली. स्पर्धा आंतर्राष्ट्रीय नियमावलीनुसार पार पडली. यास्पर्धेत सामना पंच म्हणून ईशाद बागवान , मयुर कांबळे, जावेद सय्यद, अमित पोतेकर, अजित पोतेकर, प्रफुल्ल देखणे, यांनी  तर थर्ड अंपायर म्हण्न सातारा टेनिस सेव्हन टि या युटयुब चॅनेलने काम पाहीले. संपूर्ण स्पर्धेचे स्कोअरर म्हणून चंद्रमणी बनसोडे यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने पाहीले. यास्पर्धेत पहिल्यावर्षापासून ग्राऊंडमन म्हणून काम पहाणारे धर्मा ग्राऊंडमन यांनी खेळपटटीचे काम उत्कृष्टपणे पार पाडले. जिल्हा क्रीडा अधिकारी नितिन तारळकर यांचे देखिल संपूर्ण स्पर्धेला सहकार्य राहीले.
        स्पर्धेचा समारोप अतिशय उत्साही आणि जल्लेाशात पार पडला, यावेळी जेष्ठ मार्गदर्शक सुरेशअण्णा साधले, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व मनोज शेंडे, क्रीडा मार्गदर्शक मनोज कान्हेरे, संग्राम बर्गे,प्रणव लेवे, राहुल यादव, राजाभाऊ कुंभार, धनंजय पाटील, सुजीत जाधव, अण्णा चिपळुणकर, धनंजय जाधव,उमेश वेलणकर, चकोर देशमुख, अमोल तांगडे, संदिप शिंदे, सचिन माने, मनीष घोरपडे, शिवाजी धायगुडे, रवि माने, अमित बडेकर, योगेश पाटील, सुनील भोसले, सचिन खोले, यांचेसह क्रीकेट प्रेमी व्यक्ती, खेळाडू, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेला ज्यांनी  ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार अमोल पाटुकले यांनी मानले.
                                               

Adv