खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करोना संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा सोहळा रद्द केला आहे .
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे उदयनराजे यांनी ही माहिती दिली आहे . बुधवारी उदयनराजे यांचा होणारा वाढदिवस साजरा होणार नाही, करोना संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर स्वतः उदयनराजे यांनी हा सातारकर नागरिक व हितचिंतकांच्या काळजीपोटी घेतला आहे . करोना काळात शुभेच्छा देण्यासाठी कोणीही जल मंदिर वर अजिबात गर्दी करू नये . कोणताही वाढदिवस सोहळा करण्यात येणार नाही, याची सर्व उदयनराजे समर्थकांनी व हितचिंतकांनी नोद घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे . बुधवारी उदयनराजे साताऱ्यात उपस्थित राहणार नाही त्यामुळे जलमंदिर येथे कोणी गर्दी करू नये असे कळविण्यात आले आहे .