कॉन्ट्रॅक्टर उत्कृष्ट काम करणार की निकृष्ट नागरिकांना पडला प्रश्न

409
Adv

जिल्ह्यातील काही ठेकेदार व अधिकारी यांचे असलेली संगणमत याला आळा घालण्याचे काम बांधकाम विभागाचे अधिकारी करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे कॉन्टॅक्टर मात्र स्वतःला भाऊ,दादा,तात्या,भैया,मामा संत ज्ञानदेव समजून वावरत असतील तर या कॉन्टॅक्टरान चाप लावण्याचे कामही बांधकाम विभागाने करावे अशी अपेक्षा येथील नागरिक करत आहेत

एकीव रस्त्याचे काम उगड्या डोळ्याने कसे चालू होते ते महाराष्ट्राने पाहिले तब्बल एक कोटी रुपयाचे काम किती रुपयात उरकले हा संशोधनाचा विषय आहे जशी ज्ञानदेव महाराजांनी भिंत चालवून आजही आदर्श घातला आहे … मात्र या आधुनिक ज्ञानदेवाच्या भिंतीवर भय्ये बसल्याने जिल्ह्याला मिळालेल्या खात्याला डाग तर लागणार नाही ना अशी कुजबुज आता होऊ लागली आहे

जिल्ह्यात निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्टॅक्टदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे या असल्या कॉन्टॅक्टदारांच्या वृत्तीमुळे सार्वजनिक बांधकाम खात्याला कुठेही कमी पण येणार याची दक्षता अधिकारी यांनी सुद्धा घेणे गरजेचे आहे मात्र जिल्ह्यात कुठेही काम निकृष्ट नाही असा दाखला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला नाही याला तर साठे लोटे म्हणावे की लक्ष्मी दर्शनाचा प्रसाद…

Adv