सातारा शहरात रेल्वे रिझर्वेशन बुकींग सेन्टर सुरु.. लॉक्डाउन नंतर नागरीकांना मोठी सुविधा उपलब्ध छ उदयनराजे

729
Adv

सातारा शहरापासून, सातारा रेल्वे स्टेशन सुमारे ८ कि.मी. दर आहे. देशाच्या कानाकोप-यात जाण्यासाठी सातारा रेल्वे स्टेशनवरून रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. सध्या ऑनलाईनचा जमाना असला तरी सुध्दा रेल्वे रिझर्वेशन आणि बुकींगकरीता बहुतांशी सातारकरांना रेल्वे स्टेशनवर जावे लागते.
आता मात्र राज्यपाल गणपतराब तपासे।राधिका रोड)मार्गावरील कदम टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स या एजन्सीकडे रेल्वेचे रिझर्वेशन बुकींगची सेवा पुरवण्याचे काम रेल्वेमंत्रालयाच्या मंजूरीने सोपवण्यात आले आहे. सातारकर नागरीकांनी आता रेल्वे स्टेशनवर जाण्याचा वेळ व खर्च दोन्ही बाचबून.या एजन्सीकडून रेल्वे चुकींगची सेवा प्राप्त करुन घ्यावी असे आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

भारतात दळणवळणाचे सर्वात सोयीचे आणि गतीमान साधन म्हणून भारतीय रेल्वे कडे पाहीले जाते. प्रवास करण्यास विशेष करून लांब पल्याच्या प्रवासाकरीता बहुतांशी नागरीक पहिली पसंती रेल्वे प्रवासाला देत असतात असे नमुदकरुन, ,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, भारतीय रेल्वेकडूनही अलीकडच्या काळात अनेक सोयी सुविधांबरोबरच नवीन रेल्वे वाहतुक भारतात सर्वच ठिकाणी सुरु केल्या आहेत. सातारा जिल्हयामधुन पश्चिम, उत्तर पूर्व भारताबरोबरच दक्षिण पूर्व भारतात रेल्वेची सुविधा उपलब्ध आहे. म्हणून सातारा जिल्हयातील रेल्वे प्रवाश्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यासर्व बाबींचा विचार करता, दूर असणा-या रेल्वेस्टेशनचा मुळे होणारा पैश्याचा आणि वेळेचा
अपव्यय पहाता, सातारा शहरात रेल्वेचे रिझर्वेशन/एक्सटेन्शन कौन्टर सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. प्रथमतः सातारा नगरपरिषदेच्या राजवाडा नगरपरिषद इमारतीमध्ये रेल्वे रिझर्देशन कौन्टर सुरु करण्यासाठी नगरपरिषदेकडुन ठराव पारित करण्यात आला होता. त्याचवेळी खाजगी व्यक्तीसंस्थांनी पुढाकार घेतल्यास, त्याचा तरुण उद्योजकांनाही लाभ होईल याचा विचार करून, मे.कदम टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स या
एजन्सीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजूरीसाठी पाठविला होता.
मध्यंतरी आम्ही रेल्वे मंत्री ना. पिवष गोयल यांची भेट घेवून, रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली होती. त्यामध्ये सातारा मिरज डबलट्रॅक, सातारा मिरज विद्युतीकरण, रेल्वे बोगीचा कारखाना सातारा जिल्ह्यात सुरु करणे, सातारा येथे रेक पॉईट उभारणे, वाठार,मसूर इत्यादी ठिकाणच्या रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रिज इत्यादी बाबींसह मे.कदम यांच्या प्रस्तावास मंजूरी देणे इत्यादी प्रश्नांवर चर्चा केली होती.

त्यानुसार मे.कदम टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या चालकांनी देखिल जागा-इन्फ्रास्ट्रक्चर, इ. बाबींची परिपूर्ण पूर्तता जलद करुन दिल्याने मे.कदम टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, राधिकारोड,सातारा यांना रेल्वे रिझर्वेशन बुकींगची मान्यता देण्यात आली आहे. आजच त्यांना आमच्या हस्ते जरुर ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे. या सुविधेमुळे नागरीकांचा रेल्वेस्टेशनवर जाण्याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. लाकडाउन नंतर पूर्ण क्षमतेने रेल्वे सुरु झाल्यावर सातारकरांना मोठी उपलब्धी मिळणार आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे

Adv