सातारा/प्रतिनिधी
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारावे वंशज श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांचे नुकतेच निधन झाले. शिवाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्यासोबत काम करण्याची अनेकांना संधी मिळाली आहे. त्यांच्या अनेक आठवणी वेगवेगळ््या क्षेत्रातील सामान्य ते मान्यवर व्यक्तींकडे आहेत. या आठवणींना एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या आठवणींवर आधारित ‘शिवतेज’ नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकासाठी आपल्या आठवणी लिखित स्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.
शिवाजीराजे यांनी शिक्षण, क्रीडा, साहित्य, राजकारण अशा समाजाच्या वेगवेगळ््या क्षेत्रात काम केले आहे. सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी सहा वर्षे भूषवले होते. त्यांच्यासोबत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी काम केले आहे. त्यांच्या आठवणी आणि अनुभव सामान्य माणसापासून मान्यवर व्यक्तीमत्त्वांकडे आहे. त्या सगळ््या आठवणींचे संचित एकत्र करुन पुस्तक रुपाने शिवाजीराजे यांना एक वेगळी आदरांजली समर्पित करण्यात येणार आहे. साधारण एक महिन्याच्या कालावधीत आपण आपल्या आठवणी लिखित स्वरुपात पाठवाव्यात. त्यासाठी नंदकुमार सावंत यांच्याशी मोबाईल क्रमांक ९४२२६0४५0९ वर अथवा सुशांत मोरे यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८५0४१११६३ वर संपर्क साधावा, असे आवाहन शिरीष चिटणीस आणि अमोल मोहिते यांनी केले आहे.
Home Politics|Satara District Satara City छ शिवाजीराजे यांच्यावरील ‘शिवतेज’ पुस्तकासाठी आठवणी पाठवण्याचे आवाहन