देशाला सार्थ अभिमान वाटेल असे भव्य स्मारक राजधानी सातारा येथे उभारणेत येणार आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू गुणांची प्रचिती देणारे तसेच देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे छत्रपती संभाजीमहाराज यांचे प्रेरणादायी पुतळा स्मारक मुदतीत उभारले जाईल. स्मारकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा असणार आहेच तथापि स्मारक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि गुणवैशिष्टयांची म्युरल्सउभारण्यात येणार आहेत अशी माहीती छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची बैठक नुकतीच जलमंदिर पॅलेस, सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती
उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रस्तावित स्मारकाच्या कामांचा सर्वकष आढावा घेतला.बैठकीस स्मारक समितीचे उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार हरिष पाटणे,सचिव विलासनाना शिंदे, पत्रकार विनोद कुलकर्णी, पत्रकार शरद काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, अमित कुलकर्णी, किशोर शिंदे, आणि समितीचे सर्व सदस्य
प्रमुख उपस्थित होते.यावेळी स्मारक समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना समितीचे उपाध्यक्ष हरिष पाटणे यांनीसांगीतले की, छत्रपती सभाजी महाराज यांच्या पुतळयाचे स्केच कसे असावे याबाबत नगरपरिषदेने निविदा मागवाव्यात,तसेच छत्रपती
संभाजी महाराज यांच्या धगधगत्या जीवनातील अष्टपैलुत्वाच्या घटनांना म्युरल्सच्या माध्यमातुन स्मारक परिसरातसुयोग्य स्थान असले पाहीजे या दृष्टीकोनामधुन स्मारक आणि परिसराचा आराखडा, संकल्पचित्रे तयार झाली पाहीजेत,त्या करीता नगरपरिषदेने कार्यवाही करावी अशी सूचना केली.छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा आणि स्मारक निर्धारित वेळत पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यासर्वांची आहे. स्मारकाचे आराखडे, संकल्पचित्रे इत्यादी बाबत नगरपरिषदेने निविदा आणि अन्य स्पर्धात्मक किंवाप्रोत्साहनात्मक उपक्रम राबवून, विशेष काळजीने कार्यवाही करावी अश्या सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेयांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट व नगरअभियंता दिलीप चिद्रे यांना केल्या.
प्रस्तावित स्मारक व त्याभोवतालचा परिसराबाबत नागरीकांनी आणि विशेष करुन इतिहासतज्ञांनी जरुर त्या सूचना कराव्यात, असे आवाहन देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले असून, स्मारक समितीच्या बैठकीत आलेल्या सूचनांचा योग्य तो आदर राखला जाईल असे स्पष्ट केले.
बैठकीस स्मारक समितीच्या सदस्यांसह,शिवप्रेमी नागरीक, कार्यकर्ते, बहुसंख्येने उपस्थित होते.दरम्यान, छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या राजवाडा येथील नगरपरिषदेच्या जवाहन बागेमधील पुतळा हा शरणार्थीभुमिकेचा आहे त्यामुळे तो बदलण्यात यावा अश्या तक्रार वजा सूचना अनेक इतिहासप्रेमी आणि नागरीकांनी आमच्याकडे केल्या आहेत. याबाबत छत्रपती प्रतापसिंहमहाराज थोरले यांच्या पराक्रमाला आणि समाजहितैशी भुमिकेला साजेसा ठरेल असा पुतळा त्याठिकाणी उभारण्या बाबतही समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. समितीच्या सदस्यांनी पहाणी करुन, तातडीने सदर पुतळा बदलण्याकामी योग्य तो सूचना प्रस्ताव नगरपरिषदेला देण्यासाठी तयार करावा असेही एकमताने ठरले.