सातारा, दि. १४ : शिवजयंतीनिमित्त आणि खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खा. श्री. छ. उदयनराजे मित्रसमूहाच्यावतीने साताऱ्यातील शिवजयंती मंडळांसाठी ऐतिहासिक देखावे स्पर्धा दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी दिली.
या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या मंडळांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि दहा हजार रुपये, अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय पाच हजार रुपयांचे एक उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल. स्पर्धेची परीक्षक समिती सर्व देखाव्यांचे परीक्षण १९ आणि २० फेब्रुवारी रोजी करेल. या स्पर्धेसाठी इच्छुक शिवजयंती उत्सव मंडळांनी १७ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. परीक्षकांचा निकाल अंतिम आणि सर्व स्पर्धक मंडळांवर बंधनकारक राहील.
स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी इर्शाद बागवान, मो. नं. ९८२३११३५५५ आणि कल्याण राक्षे, मो. नं. ९४२२४०२०७० यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेचे बक्षीस वितरण खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिनी, दि. २४ फेब्रुवारी रोजी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येईल.