शाहूनगरसाठी 28 कोटीची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित खा श्री छ उदयनराजे भोसले यांची माहिती

531
Adv

शाहूनगर आणि शाहूपुरी या दोन्हीमधील नागरी वसाहती, सातारा शहराचे अविभाज्य भाग आहेत. शाहूनगर भाग तर त्रिशंकु म्हणून ओळ जात होता. शाहूपुरीकरांसाठी २४ बाय ७ पाणी योजना पूर्णत्वास जात आहे, त्यामुळे शाहूनगर मधील रहिवाश्यांसाठीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुमारे २८ कोटी रुपयांची नळपाणीपुरवठा योजना नगरोथ्थान योजनेमधुन प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी नगरपरिषदेचा
२५ टक्के वाटा आणि ७५ टक्के वाटा राज्य शासनाचा राहणार आहे लवकरच ही योजनामार्गी लावून शाहूनगर विलासपूर,गोळीबार मैदान,पिरवाडी असा संपूर्ण त्रिशंकू भागातील सर्व कुटुंबांना सन २०५४ सालचीलोकसंख्या विचारात घेवन दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा नियमितपणे होण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, शाहूनगर या भागाला स्वतंत्र ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्था नसल्याने, नागरी समस्यां प्रचंड भेडसावत असत. शहरालगत भाग असल्याने याठिकाणी मोठया प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या. शाहूनगरवासियांच्या समविचारी प्रयत्नातुन काही प्रमाणात आपापल्या सोसायटयांमधील प्रश्न सोडवण्यात येत
होते. तसेच याभागाला म.जी.प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. तथापि दिवसेंदिवस झपाटयाने
वाढत असलेली लोकसंख्या आणि होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत होता. दरम्यानच्या काळात शाहूनगरचा संपूर्ण परिसर नगरपरिषदेच्या अखत्यारित आल्याने, याठिकाणचे सर्वांत
महत्वाचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत प्राधान्य देणे गरजेचे समजून, सातारा नगरपरिषद आणि महाराष्ट्र जीवन
प्राधिकरण यांच्या संयुक्त माध्यमातुन नगरोथ्थान योजनेमधुन याभागाकरीता मुबलक पुरेल अशी पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार सातारा नगरपरिषदेच्या सहकार्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,सातारा कार्यालयाच्या जलव्यवस्थापन उपविभागाने सुमारे २८ कोटी रुपयांची शाहूनगर (शहरी) नळ पाणीपुरवठा (नगरोथ्थान) योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन, राज्यशासनाकडे सादर केला आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा म्हणून, सुमारे ७कोटीपेक्षा जास्त निधी सातारानगरपरिषदेच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाने ७५ टक्के म्हणजेच २१ कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. सदरची योजना नगरोथ्थान योजनेमध्ये साकारण्यात येणार असल्याने, निधीची कमतरता भासणार नाही आणि योजनेला अंतिम मंजूरी देखिल लवकरात लवकर
मिळून, पूर्णत्वास जाईल असा आमचा विश्वास आहे.

शाहूनगर व परिसरातील नागरीकांनी आजपर्यंत पाण्यासाठी ब-यापैकी हाल सोसले आहेत. त्यामुळेच सन २०५४ सालची लोकसंख्या विचारात घेतलेली असल्याने, येथुन पूढे किमान ३०-३५ वर्षे शाहूनगर आणि परिसराला पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली आहे. या योजनेचा कृष्णा नदी उद्भव निश्चित करण्यात आलेला आहे. तथुन एमजेपीच्या जलशुध्दीकरण केंद्रामध्ये पाणी आणण्यात येणार आहे. सदरचे पाणी सध्या अस्तित्वातील टाक्यांमधुन(दोन टाक्या- ११ लक्ष आणि ७ लक्ष लिटर्सच्या आणि नव्याने उभारण्यात येणारी ५.३० लक्ष लिटर्स क्षमतेच्या उंच टाकी आणि नव्यात बांधण्यात येणा-या १०.४० लक्ष लिटर्स च्या बैठया टाक्यांमध्ये आणले जाणार आहे. त्यानंतर अस्तित्वातील वितरणनलिका आणि नव्या वितरणनलिकेव्दारे शाहूनगर आणि परिसरात पोहोचवले जाणार आहे. प्रस्तावित वितरण व्यवस्थेची एकूण लांबी सुमारे ४१
किलोमिटर इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. आत्ताच्या क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट म्हणजेच सुमारे १६ लक्ष लिटर्सचा जादा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नवीन योजना साकारल्यावर शाहूनगर, विलासपूर, गोळीबारमैदान,पिरवाडी,इ. परिसरासाठी एकूण ३३ लक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होईल असे नियोजन आहे.अतिशय नियोजनपूर्वक आणि सर्व शक्या शक्यतांची पडताळणी,चाचपणी करुन आणि शाहूनगरपरिसरातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेवून ही नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शाहू नगरवासियांना दररोज दरडोई किमान १३५ लिटर्स इतके मुबलक पाणी पुरवले जाणार आहे. त्यासाठी आम्ही स्वतः लक्ष केंद्रीत केले आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे.

Adv