खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहच्या वतीने छत्रपती शिवाजी कॉलेजचा नामफलक डिजीटल न लावल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मुदतीच्या आतच रयत शिक्षण संस्थेने छत्रपती शिवाजी कॉलेजचा नामफलक डिजिटल केल्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाला पुन्हा एकदा यश आले आहे
सातारा शहरातील रयत शिक्षण संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायन्स कॉलेज परिसरातील सर्व महाविद्यालयांचा नामफलक डिजिटल पद्धतीने करण्यात आले होते मात्र छत्रपती शिवाजी कॉलेजचा नामफलक डिजिटल पद्धती मध्ये केला गेला नव्हता या संदर्भात खा श्री छ उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दत्तात्रय बनकर, युवा नेते संग्राम बर्गे, विक्रांत पवार ,समीर माने ,पिनू चव्हाण यांनी रयत शिक्षण संस्थेचे सचिव यांना या संदर्भात निवेदन दिले होते सदरचा फलक डिजिटल पद्धतीने लागला नाही तर तीव्र आंदोलन करणार असून तो फलक एक महिन्याच्या आत लावावा अशी मागणी केली होती सदर मागणीस यश आले असून छत्रपती शिवाजी कॉलेजचा फलक हा आता दिमाखात डिजिटल पद्धतीने झाला असल्याचे दिसून येत आहे