उदयोग क्षेत्रामध्ये कष्ट घेणा-यास विकासाची मर्यादा नाही. अमर्याद संधी उपलब्ध असलेल्या या उदयोग क्षेत्रात नवउदयोजकांनी पदार्पण करुन,नोकरी करणारे नाही तर नोकरी देण्याची भुमिका बजावली पाहीजे.आपल्या बरोबरच समाजाही विकास साधला पाहीजे. याच उद्देशाने, पश्चिम महाराष्ट्रातील विदयमान आणि नव उदयोजकांना मार्गदर्शकच नव्हे तर पथदर्शक ठरेल अश्या उपक्रमाचे उदयोग परिषदेच्या माध्यमातुन शुक्रवार दिनांक12 मे रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.तरुणांना दिशादर्शक
ठरणा-या प्रेरणादायी परिषदेच्या माध्यमातुन,सातारा जिल्हयासह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यमान उदयोजकांनी तसेच नवीन उदयोग सुरु करणा-यांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले की, उदयोग या शब्दामध्ये व्यापार,व्यवसाय, उत्पादन, पणन,लॉजिस्टीक अश्या अनेक उदयोगांचा समावेश होतो.भारतामध्ये उदयोग व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना सुरु केल्या आहेत.सुदैवाने केंदीय उदयोग मंत्री ना. नारायण राणे आणि केंद्रीय अर्थराज्य मंत्री ना.भागवत कराड हे
महाराष्ट्राच्या मातीतील आहेत.याचा लाभ महाराष्ट्रीयन उदयोज कांनी उठवला पाहीजे.काही अडचणी समस्या असतील तर आमच्या पर्यंत त्या पोहोचवल्यास,त्याबाबत तातडीने मार्ग काढण्यात येवू शकेल अशी सर्वसाधारण परिस्थिती असताना, महारष्ट्रीयन किंवा मराठी उदयोजक मोठया प्रमाणात सक्रीय दिसत नाहीत. नोकरी म्हणजे सुरक्षितता ही संकल्पना आता कालबाहय झाली आहे.उदयोगामध्ये स्पर्धा किंवा जबाबदारी असली तरी,अशी रिस्क किंवा जबाबदारी घेतल्याशिवाय आपला विकास होणार नाही हे देखिल सत्य आहे.
या पार्श्वभुमीवर सध्याच्या उदयोजकांना आणि उदयोगक्षेत्रात पदार्पण करुन इच्छीणा-यांसाठी या उदयोग परिषदेचे नक्षत्र फौन्डेशन,भाजपा उदयोग आघाडी आणि उदयनराजे भोसले मित्रमंडळ यांचे वतीने आयोजन करण्यात आले आहे.या एक दिवसीय उदयोग परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सर्व महामंडळे जसे की, एमएसएमई मुंबई,जिल्हा उदयोग केंद्र, खादी ग्रामोदयोग, अण्णासाहेब पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ यांचेसह राष्ट्रीयकृत बॅन्कांनी प्राधिकृत केलेले सर्व बॅन्कांचे प्रतिनिधी, हे सहभागी होणार आहेत. तसेच या परिषदेमध्ये उदयोजकांना भाग भांडवल (इक्वीटी फंड) उभे करण्यासाठी तज्ञ प्रतिनिधींकडून मार्गदर्शनकरण्यात येणार आहे.परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अत्यंत गरजेचे आहे.रजिस्ट्रेशन करण्याची लिंक https://bit.ly/3VxoKkB अशी आहे. या लिंकवरुन रजिस्ट्रेशन करावे.नव उदयोजकांना आणि सध्याच्या उदयोज कांना अतिशय उपयुक्त असणारी ही उदयोग परिषद,सातारा
जिल्हयाच्या उदयोगक्षेत्राला नवसंजीवनी देणारी असल्याने,ही परिषद चुकवू नये अशी अपेक्षा आहे.ही परिषद यशस्वी करण्यासाठी नक्षत्र संस्था,भाजपा उदयोग आघाडीचे सर्व पदाधिकारी, उदयनराजे भोसले मित्रपरिवाराचे सर्व सदस्य, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आम्ही आपली वाट पहात आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कळविले आहे.