ज्या मध्ये जय किंबा पराजय अपेक्षित असते, त्यालाच निवडणुका म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्विकारला आहे. तसेच ज्यावेळी जय झाला त्यावेळी हरळनही गेलो नाही. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारणं तोंड वर करुन विचारताय तर आधी तुमच्या विधानसभेतील पो्टनिवडणुकीच्या पराभवाची कारणं दया. ती जी कारणे असतील तीच आमची समजा असा सडेतोड पलटवार करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, बॅन्क कायदेशीर मर्ज केली असे म्हणता, तर मर्ज करण्यासाठीच बॅन्क स्थापन केली होती का१ एक बॅन्क तुमच्या अंदाधुंद भ्रष्ट कारभाराने बुडीत काढली पण त्याकरीता दूस -या बन्केचाही गळा घोटला, सहकारी बझारचे रेस्टॉरेंट केले पुढ्े रेस्टॉरॉटही बंद पाडले हे प्रकार सहकारातील तत्वज्ञानात येत नाही परत् हाच तुमचा खरा वारसा आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे अश्या खरमरीत शब्दात जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथुन दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पूढ़े नमूद केले आहे
की, आमचा आणि तुमचा मा्ग वेगळा तर आहेच, तसेच अन्य काही बाबी आणि उदिष्ट देखिल वेगळे आहे. आम्ही
जनसामान्यांना आमचे समजतो, जनतेला जना्दन समजतो. आम्ही निस्वार्थी मनाने कार्यरत राहतो, तुमचं तसं नाही, तुम्ही
स्वार्थापोरटी जनसामान्यांना जवळ करता, जनतेचे किंया कार्यकत्यांचे विक पॉरईट हेरुन, त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत ही भावना आमची तर जनता आमच्यामुळे आहे अरशी भावना तुमची. सहकारी संस्था सभासदांाच्या मालकीच्या आणि उध्दारासाठी आहेत ही आमची धारणा तर सहकार म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता ही तुमची
धारणा. असा जो काही फरक आहे तो मुलभुत फरक आहे. त्यामुळे दोघांमधील विचारांची उंची व खोली सुध्दा केगळी
आहे. दुस-याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी आणि अहमन्य देखील समजता आहात, अहंकाराने
सर्वनाश होता हे तुम्ही जाणिवपूर्वक विसरत आहातअजिंक्यतारा कारखाना निवडणूक लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेबून तुम्ही आमच्याकड़े आला होता. निवडण्कीत लक्ष घालू नका. मी सर्व चुकांची दुरस्ती करतो असे देखिल म्हणाला होता हे इतक्यालवकर कसे विसरलात१ तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आम्ही छाती काढून सभासदापुढे गेलो तर तुमची छाती जावून,नुसत्या बरकडया राहतील याची पहिल्यांदा नौंद घ्या आणि मग आमच्या छातीकडे या.तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट असा शेध तुम्ही लावलेला आहे ती तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे असे
नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढ्धे नमुद केले आहे की, आम्ही ज्यावेळी एकादा प्रकल्प
अंतिम टप्यात येतो त्यावेळी त्याची निधीच्या आकडेवारीसह आणि तांत्रिक बार्बीसह आम्ही माहीती देत असतो. तुमच्या
सारखे आता प्रस्ताव मुख्याधिकारी यांना दिला. लगेच त्याचा फोटो आणि बातमी, आता तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे
आला,त्याचा फोटा आणि बातमी, आता तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेला, त्याचा फोटो आणि बातमी आता तो
प्रस्ताव सचिवांकडे गेला त्याची बातमी आणि त्याचा तुमचा फोटो, आता तो प्रस्ताव जर दादांकडे असेल तर त्याची बातमी
आणि यांचा फोटो. परंतु अन्य महोदयांकड़े असेल तर मात्र यांना तेथे कोणी विचारतच नाही त्यामुळे त्याची बातमी नाही
आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेवशनिस्ट नव्हे तर फंव्शनिष्ट आहात. असला प्रकार तुमचा तुम्हालाच शेभुत दिसतो.
हा फरक सुध्दा एक आपल्या मार्गातील वेगळेपण दाखवणारा आहे.सातारा-कराड हे जक्शन नाही त्यामुळे येथून गाडी सुरु करता येत नाही याचे देखिल यांना भान नाही. उचल जीभ
लाब टाळयाला असा यांचा एकंदरीत नखरा आहे. प्लॅंटफॉर्म लांबी,प्लेटफॉर्म शेड, लोहमार्गाचे दहरीकरण, विद्युतीकरण
प्रवाश्यांच्या सुविधांमधील सुधारणा अशी किती तरी कामे केली आहेत. १०-१२ वर्षापूर्वी फक्त ९ गाडयांची ये-जा सुरु
होती. आज रोजी १९ गाडयांची ये-जा सुरु आहे. म्हणजे पूर्वीच्या अप अन्ड डाबुन १८ गाडयांच्या तुलनेत ३८ ेल्वेगाडया
आज सातारा कराड मधुन धावतायत, एकदा डोळयात अंजन घालुन बघा म्हणजे दिसेल आणि समजेल, सातारा शहरात
रस्त्यांची कामे साविआ मार्फत वेळोबेळी झाली आहेत. आता पावसाळयात काही ठिकाणी खडे पड़ले आहेत त्याचे
पॅचिंगचे काम प्रशासनाने हाती घ्यावे अशी सूचना एक लोक प्रतिनिधी म्हणून केली आहे. आमच्या घरासमोरील रस्ता झाला
किंवा नाही झाला तरी सामन्य सातारकरांच्या गल्लीबोळातील रस्ते झाले पाहीजेत अशी आमची प्रशासनाला विनंती सूचना
आहे विकासपुरुष कदाचित तुम्हीच आहात. कारणविकासरत्नांचा वारसा लाभलेला आहे. आम्ही या मातीचे ऋणमानणारे आणि समाजामुळे आमचे स्थान आहे ही ठाम धारणा असणारे सर्वसामान्य जनतेचे आहोत.नगरपालिकेविषयी बिनबुडाचे आरोप करणे निर्थक आहे. सातारकरांनी आमच्याकडे सत्ता सोपवली म्हणून आरोप होणार हे अपेक्षित आहे. निवडणुकीमध्ये नगरपरिषदेच्या कारभाराबाबत जनता जना्दन जो कौल देईल तो आम्हाला मान्य असेल तथापि त्यांच्या आरोपांना आम्ही किंया सातारकर कधीच भीक घालणार नाहीत असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फटकारले आहे.





