
श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले म्हणजे लाखो मावळ्यांचा जीवच. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज उदयनराजेंचे म्हणजे हजारो प्रेमींचे हृदयसिंहासनाधीश्वर. उदयनराजे म्हणजे दिलदार, रुबाबदार राजे. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर बिनधास्त, निर्भीड जीवापाड प्रेम करणारे. त्यातील एक अनोळखी ते हृदयस्थ असा प्रवास करणारा चेहरा म्हणजे काका धुमाळ. काका म्हणजे उदयनराजेंचे ‘काळीज’च, तर उदयनराजे म्हणजे काकांसाठी ‘दोस्तीचा महाराजा’.
उदयनराजे… नाम ही काफी है! असेे व्यक्तिमत्व. दिलदार, जिगरबाज, रुबाबदार, बहारदार, हटके, प्रेमळ अशा अनेक गुणांचा ‘महाराजा’. उदयनराजे म्हणजे गर्दीतील दर्दी नेता. ‘स्टाईल इज स्टाईल’ या आपल्या हटके स्टाईलने हजारो हृदयांवर विराजमान झालेले महाराज. कोणाला वाटते त्यांच्याबरोबर फोटो काढावा, कोणाला वाटते त्यांनी खांद्यावर हात टाकावा, कोणाला वाटते, मला मिठी मारावी, त्यांनी माझी गाडी चालवावी… अशा एक ना अनेक इच्छा कार्यकर्त्यांच्या असतात.
उदयनराजे भोसले हे असे रसायन आहे की, ज्यांच्या नावातच किमया घडवण्याची ताकद आहे. ते जे करतात, बोलतात ती स्टाईल होते. हीच स्टाईल, डॉयलॉग लाखोंच्या हृदयांची ठाव घेते. म्हणजेच देशभरात, राज्यात उदयनराजेंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. राज्याच्या, देशाच्या राजकारणात सर्वाधिक टीआरपी असणारा नेताही उदयनराजेच आहेत. उदयनराजेंचा कोणताही कार्यक्रम असो ते प्रकर्षाने दिसतेच. उदयनराजेंनी आपल्या खांद्यावर हात टाकावा, आपल्याकडे नजरेचा कटाक्ष टाकावा, यासाठी असंख्य कार्यकर्ते जीवाचे रान करतात. जसे उदयनराजेंवर कार्यकर्ते प्रेम करतातच, तितकेच, एव्हाना त्यापेक्षा कित्येक पटीने उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांवर प्रेम करत असतात. त्याची अनेक उदाहरणे सातारकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली आहेत. असे एक उदाहरण म्हणजे काका धुमाळ. उदयनराजेंची ताकद ही त्यांचा करिष्मा आहे, तशीच त्यांच्या भोवतालचे निष्ठावान मावळे, कार्यकर्ते आणि दोस्तांची आहे.
उदयनराजे ज्यांच्यावर अतिव प्रेम करतात, त्यातील एक म्हणजेच काका धुमाळ. उदयनराजेंशी एकनिष्ठ असलेल्या काकांचे उदयनराजेंच्या हृदयातील मैत्रीचे स्थान अढळ आहे. उदयनराजे आणि काकांची दोस्ती उभी महाराष्ट्र पाहतो. उदयनराजेंचे मन काकांनी ओळखावे अन् काकांचे मन उदयनराजेंनी ओळखावे, इतके दोघे एकमेकांचे झाले आहेत. त्यांचे दोस्ती अवघ्या ८ वर्षांची. अजिंक्यतारा किल्ल्याप्रमाणे ‘अजिंक्य’, कोयना- कृष्णा नदीप्रमाणे लाखोंची तहान भागविणारी, कास पुष्प पठाराप्रमाणे डोळ्याचे पारणे फेडणारी, अशीच.
होतकरु काका धुमाळ हे स्वत:चे नशीब आजमवण्यासाठी २०१० साली साताऱ्यात आले. काका धुमाळ यांनी साताऱ्यातील बाजार समितीत कांदा, बटाटा व्यापारासाठी गाळा घेतला. नवख्या काकांनी व्यवसायात आपला जम बसवण्यास सुरुवात केलेली. सुस्वभावी, मितभाषी, निगर्वी, लोकसंग्रह हे काकांमधील गुण कामांचे नेतृत्व विकसित करत होते. बाजार समितीमध्ये त्यांनी आपल्या विचारांवर प्रेम करणाऱ्या व्यावसायिकांची संबंध बांधले. सहाजिकच काकांनी बाजार समितीतून पुढे जाण्यासाठी, स्वत:ची उंची वाढविण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली.
पुढे २०१५ ला सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. या निवडणुकीत नेहमीच व्यापारी प्रतिनिधी म्हणून दोन प्रतिनिधी हे किराणा भुसारचे व्यापारी असायचे. कांदा, बटाटा, भाजीपाला या वर्गातील प्रतिनिधी त्यावेळीपर्यंत केव्हाही संचालक झालेला नव्हता. त्यावेळी मार्केटमधील व्यापाऱ्यांची इच्छा होती की, आपला प्रतिनिधी कोणी तरी बाजार समितीवर गेला पाहिजे. ही इच्छा निर्माण होण्यामागे काकांचे व्यापाऱ्यांशी असलेले संबंधच कारणीभूत होते. त्यावेळी काकांनी बाजार समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनातून निवडणूक लढवली जाणार होती. त्यावेळी व्यापारी वर्गातून दोन प्रतिनिधी पैकी एक उदयनराजे गटाला, तर एक शिवेंद्रसिंहराजे गटाला प्रतिनिधीत्व दिले जाणार होते. शिवेंद्रसिंहराजेंकडून सुनील झंवर यांना, तर उदयनराजेंकडून अन्य एकास ग्रीन सिग्नल होता. राजकारणापासून विशेषत: राजे घराण्यापासून कोसो दूर असलेल्या काकांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. उदयनराजेंनी काका धुमाळ कोण, याची चौकशी केली. उदयनराजेंनी काकांना जलमंदिरवर बोलावून घेतले. फॉर्म कशासाठी भरला, असा प्रश्न केला. ‘छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी ओळख झाली पाहिजे, महाराजांनी मला नावानिशी ओळखले पाहिजे,’ यासाठी अर्ज भरल्याचे काकांनी सांगितले. त्यावेळी उदयनराजेंनी सांगितले की ‘जा… अर्ज काढ’. काका त्याच क्षणी कोणताही न विचार करता अर्ज काढण्यासाठी जलमंदिरवरुन बाहेर पडण्यास निघाले. चार पावले पुढे गेले, तोपर्यंत उदयनराजेंनी पुन्हा बोलावले. पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर काकांनीही तेच उत्तर दिले. दुपारी ३ वाजण्यास काही मिनिटांचा अवधी बाकी होता. त्यावेळी उदयनराजेंनी या मुलाचा अर्ज ठेवा, असे सांगून त्यांच्या दुसऱ्या प्रतिनिधीचा अर्ज मागे घ्यायला लावला. हाच तो उदयनराजे आणि काकांच्या दोस्तीचा पहिला अध्याय.
राजकारणात पाऊल ठेवणे तशी सोपी बाब नाही. अनेकांना राजकीय पार्श्वभूमी असूनही राजकारणाला रामराव करावा लागतो. मात्र, स्वत:ला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी, गॉडफादर नसतानाही काकांनी राजकारणात उतरण्याचे धाडस दाखवले. काकांची तडफ पाहूनच उदयनराजे त्यांच्या फिदा झाले, ते आजपर्यंत. उदयनराजेंनी काकांना बाजार समितीच्या संचालकपदाची संधी दिली.
ऐवढेच नव्हे तर काकांवर इतका विश्वास ठेवला की बाजार समितीत उदयनराजेंची सर्वस्वी जबाबदारी काकांवर होती. त्यामुळे उदयनराजेंशी काकांचे आणखी घनिष्ठ संबंध तयार झाले. काकांची काम करण्याची धाटणी पाहून उदयनराजेंनी काकांवर आणखी जबाबदाऱ्या देवू केल्या. २०१८-१९ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदमधील उदयनराजेंच्या कामांची जबाबदारी काका पेलत आहेत. विकासकामे योग्यरीत्या करुन घेण्यात काकांचा हातकंडा असल्याने या जबाबदाऱ्याही ते समर्थपणे पेलत आहेत.
उदयनराजे जितके प्रेमळ आहेत, तितकीच त्यांची दहशतही आहे. जे चुकीचे कामे करताना त्यांच्यासाठी ते डेंजरच असतात. मात्र, निष्ठावंतासाठी ते अगदी हळव्या मनाचे आहेत. याबाबत काका धुमाळ यांना विचारले असता ते सांगतात की, ‘उदयनराजे हे एक हृदयस्पर्शी व्यक्तिमत्व आहेत. कोणाला जीव लावला तर किती जीव लावायचा असतो, हे उदयनराजेंकडून शिकावे. उदयनराजे हे एक विकासाभिमुख, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे बोगदा करावा, यासाठी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सन २००० पासून पाठपुरावा केला. या कामासाठी सर्वाधिक पाठपुरावा तेच करत आहेत. त्यांच्यामुळेच आज खंडाळा बोगद्याचे काम पूर्णत्वाकडे निघाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास निधी मिळण्यासाठी, इतर परवानग्या मिळण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळत आहे. साताऱ्यातील पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय घेवून तो पूर्णही केला. कास धरणाची उंची वाढ करुन सातारकरांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले आहेत. सातारा शहराला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी, अजिंक्यतारा किल्ला, प्रतापगडावर रोप वे उभारण्यासाठी ते प्रयत्न करत असून, लवकरच त्याला मुहूर्त रुप येणार आहे. फॉलोऑप कसावा घ्यावा, हे उदयनराजेंकडून शिकावे. इतकेच काय, छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुषांचा अवमान झाला, तो करणाऱ्यांविरोधात कितीही किंमत मोजावी लागली तरीही त्याला विरोध कसा करायचा, कोणत्या टोकापर्यंत जायचे, हे उदयनराजेंकडूनच शिकावे, असे काका धुमाळ सांगतात.
उदयनराजे आणि काकांची दोस्ती म्हणजे अगदी ‘चंद्रविलास’च्या चवदार मिसळप्रमाणे. या मिसळची चव दुसऱ्या कोणत्याच मिसळला येत नाही, तशी उदयनराजे- काकांच्या दोस्तीची सर दोस्तीच्या दुनियेत कोणालाच न येणारी. एखादा दिवस काका उदयनराजेंना भेटले नाही किंव्हा त्यांचा फोनद्वारे संपर्क झाला नाही तर दोघेही बैचेन होतात. त्यावर उदयनराजेंचा डॉयलॉग ठरलेला असतो, तो म्हणजे… ‘हिच का दोस्ती, फोन बीन करायचा कळतो की नाही…’ हा उदयनराजेंचा दिलखेचक डॉयलॉग काकांच्या हृदयाचा ठाव घेतो. काका म्हणजे उदयनराजेंचं काळीजच. इतकी दोघांची घट्ट मैत्री. विशेष म्हणजे हा प्रवास असा की… एक अनोळखी ते हृदयस्थ.
उदयनराजेंनी एखाद्यावर विश्वास टाकला की ते मागे पुढे पाहत नाहीत. जमा, खर्च, हिशोब हे शब्दच उदयनराजेंच्या डिक्शनरीमध्ये नाहीत. निष्ठावान कार्यकर्त्यांवर कसे प्रेम करायचे असते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले.
चाय में शक्कर नहीं
तो पीने में क्या मजा,
जिंदगी में उदयनराजे नहीं
तो जीने में क्या मजा!!
लकीरे तो हमारी भी बहुत खास है,
तभी तो उदयनराजे जैसा दोस्त हमारे पास है!





